आम्हाला हक्काच्या जागेत पक्के घर द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:14 AM2021-06-30T04:14:28+5:302021-06-30T04:14:28+5:30

जवळे येथील ५० आदिवासी कुटुंब गायरान क्षेत्रात झोपड्यांमध्ये राहत आहेत. येथील काही कुटुंबांना तीस वर्षांपूर्वी घरकूल मिळाले होते. या ...

Give us a permanent home in the right place | आम्हाला हक्काच्या जागेत पक्के घर द्या

आम्हाला हक्काच्या जागेत पक्के घर द्या

जवळे येथील ५० आदिवासी कुटुंब गायरान क्षेत्रात झोपड्यांमध्ये राहत आहेत. येथील काही कुटुंबांना तीस वर्षांपूर्वी घरकूल मिळाले होते. या घरांची मात्र आज दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात घरात पाणी शिरून चिखल होतो. कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून हाताला काम नसल्याने माळरानातील डोंगरात जाऊन करवंदी, चिंचा एकत्र करून त्या विकून उपजीविका करावी लागत असल्याची व्यथा आदिवासी समाजातील कांताबाई जाधव यांनी सांगितली. घराची दुरुस्ती करण्यासाठीही पैसे नाहीत. भविष्यात जर गायरान जागेतील घरे हटविले, तर आम्ही कुठे जावे कुठे, राहावे आणि राहावे कुठे, अशी समस्या निर्माण होणार आहे. त्यामुळे शासनाने आम्हाला हक्काचे घर द्यावे, अशी कांताबाई यांच्यासह जवळे येथील आदिवासी बांधवांनी केली आहे.

---------------------------

इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या, तेव्हा आम्हाला घरे मिळाली होती. त्या घरांची आज मोठी दुरवस्था झाली आहे. मला दोन मुले आहेत. ते वेगवेगळी राहतात. मात्र, त्यांनाही पक्के घर नाही. आम्हाला रेशन कार्ड, आधार कार्ड आहे, परंतु हक्काच्या जागेत घरकूल नसल्याने आजही जवळे ग्रामपंचायत हद्दीतील गायरानात असणाऱ्या जागेत झोपडी बांधून राहावे लागत आहे.

गेऊबाई देशमुख, जवळे

फोटो आहे.

Web Title: Give us a permanent home in the right place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.