कामगारांना काम द्या, नाही तर आर्थिक मदत तरी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:20 AM2021-04-15T04:20:40+5:302021-04-15T04:20:40+5:30
याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंधरा दिवसांची संचारबंदी पुकारून लॉकडाऊन केले आहे. ...
याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंधरा दिवसांची संचारबंदी पुकारून लॉकडाऊन केले आहे. यात विविध घटकांतील कामगारांना दिलासा दिला आहे. कारखाने व उत्पादने बंद न ठेवता नियम व अटीनुसार उत्पादन सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे, तर आर्थिकदृष्ट्या गरीब कामगारांना पंधराशे रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. विडी कामगारदेखील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरीब असून, रोजंदारीवर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. राज्य सरकारने पंधरा दिवसांचा लॉकडाऊन केला असल्याने विडी कामगारांनादेखील जिल्हाधिकाऱ्यांनी १५ दिवसांसाठी नियोजन समितीच्या कोट्यामधून प्रत्येक कामगारास दीड हजार रुपये अनुदान द्यावे, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
निवेदन देतेवेळी आयटकचे सचिव अॅड. कॉ. सुधीर टोकेकर, उपाध्यक्ष भारती न्यालपेल्ली, इंटकचे अध्यक्ष शंकरराव मंगलारप, सरोजनी दिकोंडा, विनायक मच्चा, कविता मच्चा, शारदा बोगा, कमलाबाई दोंता, लक्ष्मीबाई कोटा, ईश्वराबाई सुंकी आदी उपस्थित होते.
------------
फोटो - १४ विडी कामगार
ओळी-
विडी कामगारांना आर्थिक मदत द्यावी, विडी कारखान्यांना घरखेप सुरू ठेवण्याच्या मागणीचे निवेदन विडी कामगार युनियनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले.