स्वच्छता दूत ढाकणे यांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:20 AM2021-01-23T04:20:33+5:302021-01-23T04:20:33+5:30
कोपरगाव : शहरातील गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा कोपरगाव नगरपरिषदेचे स्वछता दूत आदिनाथ ढाकणे यांचा नुकताच शिर्डीचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे ...
कोपरगाव : शहरातील गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा कोपरगाव नगरपरिषदेचे स्वछता दूत आदिनाथ ढाकणे यांचा नुकताच शिर्डीचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी शिर्डी येथे प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला आहे.
यावेळी प्रांताधिकारी शिंदे प्रशस्तीपत्रात म्हटले, आपण दहा वर्षांपेक्षा अधिक काळ सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत आहात. यात शैक्षणिक सामाजिक, स्वच्छता दूत, स्वच्छ भारत नागरी अभियान, शहर स्वच्छता मोहीम, स्वच्छ सर्वेक्षण अभियान, जलशक्ती अभियान, वृक्षारोपण अभियान, पशुपक्षी पर्यावरण संवर्धन अभियान, शासन योजना जनजागृती, कला, अभिनय, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, श्री गणेश विसर्जन, कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखणे कामी जनजागृती, गरजूंना मदत या सर्व कार्यामध्ये आपण सक्रिय सहभाग घेत आहात. भारताचे जलपुरुष जलसंधारण तज्ज्ञ रेमन मॅगसेस व पाण्याचे नोबल पुरस्कार विजेते राजेंद्र सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली गोदामाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून पाणी परिषद, जलदिंडी व गोदावरी नदी अविरत व निर्मल ठेवण्याचे कार्य नियमितपणे करत आहात. आपल्या या कार्याची दखल घेत कोपरगाव नगरपरिषदेने आपली स्वच्छता दूत म्हणून निवड केली. या कार्यात आपले तसेच सर्व सहकारी यांचे निस्वार्थ योगदान महत्त्वपूर्ण आहे. आपण करत असलेल्या सेवेबद्दल आपणास हे प्रशस्तीपत्र गौरवपूर्वक प्रदान करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.
........... ..
फोटो२२आदिनाथ ढाकणे गौरव
220121\img-20210122-wa0028-01.jpeg
शिर्डी येथे स्वच्छता दूत आदिनाथ ढाकणे यांना प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी प्रशस्तीपत्र देउन गौरवीत केले.