कोरोनाच्या संकट काळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या परिचारिकांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:21 AM2021-05-13T04:21:17+5:302021-05-13T04:21:17+5:30
अहमदनगर : परिचारिका दिनानिमत्त कोरोनाच्या संकट काळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या परिचारिकांचा बुधवारी ठिकठिकाणी सन्मान करण्यात आला. ...
अहमदनगर : परिचारिका दिनानिमत्त कोरोनाच्या संकट काळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या परिचारिकांचा बुधवारी ठिकठिकाणी सन्मान करण्यात आला. येथील बुथ हॉस्पिटलमधील परिचारिकांचा गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला. आयुर्वेद महाविद्यालयातील परिचारिकांचा जय आनंद फाउंडेशनच्या वतीने आमदार अरुण जगताप यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सावेडी उपनगरातील नगरसेवक ॲड. राजेश कोतोरे यांच्या वतीने लसीकरण केंद्रावर आरोग्य सेवा पुरविणाऱ्या महापालिकेच्या परिचारिकांचा गौरव करण्यात आला.
....
...
फोटो ओळी : आयुर्वेद महाविद्यालयातील परिचारिकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करताना आमदार अरुण जगताप. समवेत नगरसेवक विपुल शेटीया, मर्चंट बँकेचे संचालक कमलेश भंडारी, जय आनंद फाउंडेशनचे अध्यक्ष रितेश पारक, महावीर बोरा, अमित काबरा, श्रेनिक शिंगवी, आनंद चोपडा, विनोद कटारिया, संभाजी पवार, भुपेंद्र परदेशी, डॉ. समीर होळकर, प्राचार्य डॉ. निंबाळकर, आदी उपस्थित होते.
..
फोटो ओळी : नागापूर येथील महापालिकेच्या आरोग्य केंद्रातील परिचारिकांचा नगरसेवक ॲड. राजेश कोतोरे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. समवेत ह.भ.प. तुकाराम महाराज कातोरे, बाळासाहेब काकडे, गोटू कराळे, राहुल कोतोरे, सुरेश भोर, गणेश कातोरे, आदी उपस्थित होते.
...
सूचना: तिन्ही फोटो मेलवर पाठविले आहे.