घुमनदेव परिसरात बिबट्याकडून शेळ्यांचा फडशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 01:15 PM2020-05-10T13:15:54+5:302020-05-10T13:16:24+5:30
श्रीरामपूर तालुक्यातील घुमनदेव येथे बिबट्याचा धुमाकुळ सुरूच आहे. येथील मुळा-प्रवरा वीज संस्थेचे निवृत्त कर्मचारी अमृत बोडखे व भाऊसाहेब कांगुणे यांच्या वस्तीवर बिबट्याने प्रवेश करून बोडखे यांची एक शेळी व कांगुणे यांच्या एका शेळीचा फडशा पाडला. ही घटना ७ मे रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली.
टाकळीभान : श्रीरामपूर तालुक्यातील घुमनदेव येथे बिबट्याचा धुमाकुळ सुरूच आहे. येथील मुळा-प्रवरा वीज संस्थेचे निवृत्त कर्मचारी अमृत बोडखे व भाऊसाहेब कांगुणे यांच्या वस्तीवर बिबट्याने प्रवेश करून बोडखे यांची एक शेळी व कांगुणे यांच्या एका शेळीचा फडशा पाडला. ही घटना ७ मे रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली.
शेळ्यांचा आवाज ऐकल्यावर बोडखे यांनी घराच्या खिडकीतून पाहिले. यावेळी एक बिबट्या शेळीला घेवून जात असल्याचे दिसून आले. बोडखे यांनी आरडाओरडा केला. अनेकांनी बिबट्याचा त्याचा पाठलाग केला. परंत तो शेजारच्या उसात शेळीला घेवून पसार झाला. बिबट्याच्या दहशतीने नागरिकात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. रणजीत बोडखे, बापू नवले, राजेंद्र राजपूत, अशोक गायकवाड, शिवाजी शिरसाठ, रवींद्र बोडखे, राजेंद्र बोडखे यांनी तातडीने पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करावे, अशी मागणी वनखात्याकडे केली आहे. वनपरीक्षेत्र अधिकारी संतोष जाधव, श्रीरामपूर येथील वनरक्षक विकास पवार यांनी तातडीने पिंजरा लावण्याचे आश्वासन दिले आहेत.