चोरट्यांचा थरार : शेळ्या चोरणाऱ्या चोरट्यांचा ग्रामस्थांवर हवेत गोळीबार; वाहन सोडून चोरटे फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 03:40 PM2020-10-16T15:40:22+5:302020-10-16T15:44:06+5:30

शेळ्या चोरुन चार चाकी वाहनातून पळ काढणाऱ्या चोरट्यांच्या वाहनाला अपघात घडला. या दरम्यान, ग्रामस्थांनी पाठलाग केला. यावेळी चोरटे हवेत गोळीबार करुन फरार झाले. ही घटना शेवगाव तालुक्यातील शेकटे खुर्दनजीक गुरुवारी (१५ ऑकटोबर) मध्यरात्री घडली.

Goats stolen by firing in the air; The thief's car also had an accident | चोरट्यांचा थरार : शेळ्या चोरणाऱ्या चोरट्यांचा ग्रामस्थांवर हवेत गोळीबार; वाहन सोडून चोरटे फरार

चोरट्यांचा थरार : शेळ्या चोरणाऱ्या चोरट्यांचा ग्रामस्थांवर हवेत गोळीबार; वाहन सोडून चोरटे फरार

बोधेगाव : शेळ्या चोरुन चार चाकी वाहनातून पळ काढणाऱ्या चोरट्यांच्या वाहनाला अपघात घडला. या दरम्यान, ग्रामस्थांनी पाठलाग केला. यावेळी चोरटे हवेत गोळीबार करुन फरार झाले. ही घटना शेवगाव तालुक्यातील शेकटे खुर्दनजीक गुरुवारी (१५ ऑकटोबर) मध्यरात्री घडली.

     लाडजळगाव येथील पैठण-पंढरपूर रस्त्यालगत राहत असलेल्या मधुकर सदाशिव पाटील (वय ४०) या शेतकऱ्याच्या घराजवळील पत्राशेड मध्ये बांधलेल्या दोन शेळ्या चोरट्यांनी गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरल्या. यावेळी शेळ्यांच्या ओरडण्याने शेजारीच असलेल्या जालींदर पाटील यांना जाग आली. त्यांना चोरटे शेळ्या गाडीत उचलून टाकताना दिसले. त्यांनी आरडाओरडा केल्याने आजुबाजूचे सर्वच उठले. तेव्हा चोरट्यांनी शेळ्यांसह गाडीतून घोगस पारगाव रस्त्याने पळ काढला. दरम्यान, लाडजळगाव ग्रामस्थांनी घोगस पारगाव येथील काही नागरिकांना फोनवरून याबाबत कल्पना दिली. पारगावच्या ग्रामस्थांनी तात्काळ बैलगाड्याने रस्ता अडवला. ते पाहून चोरटे पुन्हा माघारी फिरले. तोपर्यंत लाडजळगाव येथील ग्रामस्थ शेकटे खुर्द याठिकाणी खडी क्रेशरनजीक रस्त्याच्या दुतर्फा दबा धरून बसले होते. चोरटे येताच गावकऱ्यांनी गाडीच्या दिशेने दगडफेक केली. चोरट्यांनी देखील हवेत फायर करून गाडी तलावाच्या कच्च्या रस्त्याने घातली. परंतु अंधारामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने सदरील गाडी उलटली. ग्रामस्थ पोहचेपर्यंत चोरट्यांनी त्याठिकाणीहून पळ काढला. गाडीमध्ये चार शेळ्या आढळून आल्या. त्यापैकी एक शेळी मृत झाली होती.

    सदरील घटनेची माहिती समजताच, बोधेगाव पोलिस दूरक्षेत्राचे पोलीस काॅन्स्टेबल नामदेव पवार, संपत एकशिंगे, उमेश गायकवाड तसेच शेवगाव पेट्रोलींगचे कर्मचारी आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्या गाडीमध्ये एका महिलेच्या आधार कार्डची झेराॅक्स सापडली आहे. शुक्रवारी मधुकर पाटील यांनी शेवगाव येथे घटनेची फिर्याद दाखल केली. पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

Web Title: Goats stolen by firing in the air; The thief's car also had an accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.