गोदावरी कालव्यांना उन्हाळाची दोन आवर्तने द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:20 AM2021-04-04T04:20:21+5:302021-04-04T04:20:21+5:30

कोपरगाव : नाशिक पाटबंधारे विभागाच्या दारणा धरणातून कोपरगाव तालुक्याच्या लाभक्षेत्रातील गोदावरी डाव्या व उजव्या कालव्यांना उन्हाळाची दोन आवर्तने द्यावीत, ...

Godavari canals should be given two cycles of summer | गोदावरी कालव्यांना उन्हाळाची दोन आवर्तने द्यावी

गोदावरी कालव्यांना उन्हाळाची दोन आवर्तने द्यावी

कोपरगाव : नाशिक पाटबंधारे विभागाच्या दारणा धरणातून कोपरगाव तालुक्याच्या लाभक्षेत्रातील गोदावरी डाव्या व उजव्या कालव्यांना उन्हाळाची दोन आवर्तने द्यावीत, अशी मागणी कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी पाटबंधारे विभागाचे राज्य सचिव यांना इमेलद्वारे पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.

काळे म्हणाले, नाशिक पाटबंधारे विभागाचे गोदावरी डावा व उजवा कालव्यासाठी दारणा धरणातील आठ व गंगापूर धरणातील ३ टीएमसी पाणी आरक्षित आहे. असे एकूण ११ टीएमसी आरक्षित आहे. २६ मार्च अखेर दारणा धरणात ५ व गंगापूर धरणात ३ टीएमसी पाणी शिल्लक होते. तसेच रब्बी हंगामाच्या अवर्तनात केवळ दोन ते अडीच टीएमसी पाणी वापरले गेले आहे. सध्या दारणा धरणात पाच टीएमसी पाणी शिल्लक आहे. रब्बीतील गहू, हरभरा, मका आदी पिके संपली आहे. त्यामुळे जर रब्बीमध्ये अडीच टीएमसी पाण्यात एक आवर्तन झाले, तर उन्हाळ्यात शिल्लक पाच ते सात टीएमसी पाण्यात एप्रिल व मे मध्ये निश्चितच दोन आवर्तने होऊ शकतात. त्यामुळे पाटबंधारे १५ ते ३० एप्रिल आणि १५ ते ३० मे असे दोन उन्हाळ आवर्तने द्यावीत.

Web Title: Godavari canals should be given two cycles of summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.