गोदावरीच्या पाण्याने मंजूर येथील बंधारा फुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 05:23 PM2017-10-10T17:23:28+5:302017-10-10T17:27:13+5:30

नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडल्यानंतर कोपरगाव तालुक्यातील मंजूर येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधारा पाण्याच्या अति दाबामुळे मंगळवारी सकाळी फुटला.

 Godavari water sanctioned bundar split | गोदावरीच्या पाण्याने मंजूर येथील बंधारा फुटला

गोदावरीच्या पाण्याने मंजूर येथील बंधारा फुटला

ठळक मुद्देमातीचा भराव वाहून गेलालाखो लिटर पाणी वाया

कोपरगाव : गोदावरी नदीला आलेल्या प्रचंड पाण्यामुळे मंगळवारी सकाळी तालुक्यातील मंजूर येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधारा फुटून लाखो लिटर पाणी वाहून गेले. मातीचा भराव वाहून गेला.
गेल्या काही दिवसांपासून पावसाने सर्वत्र हजेरी लावली आहे. नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्याने गंगापूर व दारणा धरणातून गोदावरी नदीला पाणी सोडण्यात आले आहे. रात्रीतून नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने पातळी वाढली आहे. परिसरातील मंजूर, चासनळी, मोर्विस, धामोरी आदी गावांना वरदान ठरलेला मंजूर येथील बंधारा प्रचंड पाण्याच्या दाबामुळे फुटला. मातीचा भराव वाहून गेल्याने बंधाºयातील लाखो लिटर पाणी वाया गेले. बंधा-याचे पाणी परिसरातील शेतामध्ये घुसून पिकांचे मोठे नुकसान झाले. बंधारा तातडीने दुरूस्त करून देण्याची मागणी शेतक-यांनी केली आहे.
४-५ वर्षांपूर्वी याच बंधा-याचा मातीचा भराव वाहून गेला होता. त्याच घटनेची पुनरावृत्ती झाल्याने बंधारा कमकुवत होऊन फुटण्याची भीती व्यक्त होत आहे.
 

Web Title:  Godavari water sanctioned bundar split

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.