कुकडी कालव्यात वाहून गेलेले सोने तीन दिवसांनी सापडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2020 02:45 PM2020-05-02T14:45:38+5:302020-05-02T14:46:32+5:30
पारनेर तालुक्यातील जवळे येथील कुकडी डावा कालवा लगात असणाºया सिद्धेश्वरवाड्यात एका महिलेचे अडीच तोळे सोने पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले होते. हे सोने तीन दिवसानंतर पुन्हा याच परिसरात सापडले आहे.
जवळे : पारनेर तालुक्यातील जवळे येथील कुकडी डावा कालवा लगात असणाºया सिद्धेश्वरवाड्यात एका महिलेचे अडीच तोळे सोने पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले होते. हे सोने तीन दिवसानंतर पुन्हा याच परिसरात सापडले आहे.
पारनेर तालुक्यातील गुणोरे येथून जवळे, सांगवी सूर्या मार्गे पारनेरकडे वैशाली दामू औटी त्यांचा मुलगा दुचाकीवरुन बुधवारी दुपारी चालले होते. यावेळी ते दोघे माळवाडी येथील सिद्धेश्वर ओढ्यावरील असणाºया पुलावरून जात होते. यावेळी दुचाकीस्वाराचा तोल गेला. यामुळे वैशाली यांच्या हातातील पिशवी पाण्यात पडली. यावेळी कुकडीच्या कालव्याला पाणी वहात होते. यात ही पिशवी वाहून गेली. सदर महिलेने तातडीने पाण्यात उडी घेतली परंतु ती पिशवी हात लागली नाही. वैशाली औटी यांनी तीन दिवसानंतर शनिवारी ज्याठिकाणी पिशवी गेली होती त्या परिसरात शोधाशोध केली. यावेळी त्यांना जवळ असलेल्या बंधाºयात तरंगताना पिशवी दिसली. ही पिशवी लोकांच्या मदतीने बाहेर काढली. त्यावेळी त्यात असणारी सोन्याचे दागिने असलेला डब्बा तसाच मिळाला. सदर महिलेने कर्मचारी नामदेव बरशिले व परिसरातील शेतक-यांचे आभार मानले.
महिलेचे वाचविले प्राण
वैशाली औटी या महिलेने पिशवी शोधण्यासाठी पाण्यात उडी घेतली होती. यावेळी कुकडी डावा कालव्याचे कर्मचारी नामदेव बरशिले यांनी परिसरात असणाºया शेतकºयांच्या मदतीने सदर महिलेला पाण्याबाहेर काढले. तिला धीर देत सांगितले की, तुझ्या घरी तुझे सोन्यासारखी मुले, पती, कुटुंब आहे. त्यामुळे तुझ्या सोन्यापेक्षा तुझा जीव महत्वाचा आहे. सोने पुन्हा करता येईल असा आधार दिला. तीन दिवसानंतर दिवसांनी पाणी कमी झाल्यानंतर पुन्हा शोध घेऊ, असे सांगितले.