राष्ट्रीय सब ज्युनिअर महिला कुस्ती स्पर्धेत श्रीगोंद्याच्या भाग्यश्रीला गोल्ड, कर्जतच्या सोनालीला सिल्व्हर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 10:56 AM2018-06-17T10:56:54+5:302018-06-17T10:58:03+5:30
मेरठ येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय सब ज्युनिअर महिला कुस्ती स्पर्धेत श्रीगोंद्याची भाग्यश्री फंड हिने ५७ किलो वजन गटात सुवर्ण तर कर्जतची सोनाली मंडलिक हिने ५० किलो वजन गटात सिल्व्हर पदकाची लयलूट करीत दिल्लीचे राष्ट्रीय कुस्ती मैदान गाजविले आहे.
श्रीगोंदा : मेरठ येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय सब ज्युनिअर महिला कुस्ती स्पर्धेत श्रीगोंद्याची भाग्यश्री फंड हिने ५७ किलो वजन गटात सुवर्ण तर कर्जतची सोनाली मंडलिक हिने ५० किलो वजन गटात सिल्व्हर पदकाची लयलूट करीत दिल्लीचे राष्ट्रीय कुस्ती मैदान गाजविले आहे.
भाग्यश्री फंडने तर गेल्या सहा महिन्यांत राष्ट्रीय स्तरावरील शालेय, खेलो इंडीया व सब ज्युनिअर कुस्ती स्पर्धेत तीन सुवर्ण पदके जिंकून हॅटट्रिक साधली आहे. कर्जतच्या सोनाली मंडलिकने राष्ट्रीय स्तरावरील शालेय मध्ये सुवर्ण खेलो इंडीया त बॉझ तर आता सिल्व्हर पदक पटकविले आहे
मेरठमध्ये झालेल्या स्पर्धेत ५७ किलो वजन गटात भाग्यश्रीला पहिल्या फेरीत बाय मिळाला. दुस-या फेरीत भाग्यश्रीने दिल्लीच्या नेहाला लोळविले. तिस-या फेरीत भाग्यश्रीने कर्नाटकच्या सुजाता पाटीलला अस्मान दाखविले. अंतिम सामन्यात मनिपुरच्या बिस्वरीयावर १० विरूद्ध ० गुणांनी मात करत सुवर्ण पदकावर नाव कोरले. ५० किलो वजन गटातील सोनालीचा अंतिम सामना मनिपुरची आरती बरोबर झाला. ७ विरूद्ध ६ असा एका गुणान ेआरतीने सोनालीचा पराभव झाला. त्यामुळे सोनालीला सिल्व्हरवर समाधान मानावे लागले.