खासदार सुजय विखे व आमच्यात चांगला संवाद- जिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 11:17 AM2020-08-04T11:17:04+5:302020-08-04T11:18:15+5:30
अहमदनगर : लोकप्रतिनिधींना विश्वासात घेत नाही, असे घडलेले नाही. खासदार कोठे बोलले व काय बोलले याची कल्पना नाही. मात्र, आमच्यात चांगला संवाद आहे. आरोग्य कर्मचाºयांची भरती देखील सुरु आहे. मात्र, डॉक्टरच मिळत नसल्याने अडचणी येत आहेत, असे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सांगितले.

कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. तसेच रुग्णसंख्या वाढुनही उपाययोजना होत नाहीत. लॉकडाऊन होत नसल्याने रुग्ण वाढत आहेत, असे खासदार डॉ. सुजय विखे हे वारंवार सांगत आहेत. या पार्श्वभूमीवर एका फेसबुक संवादात विखे यांनी प्रशासनाबाबत हतबलता व्यक्त केली. या पार्श्वभूमीवप खासदार डॉ. सुजय विखे यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांबाबत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची बाजू जाणून घेतली. ते म्हणाले, डॉ. विखे यांच्यात व आमच्यात चांगला संवाद आहे.
जिल्ह्यातील कोरोनाची वस्तुस्थिती द्विवेदी यांनीही फेसबुकवरून साधलेल्या संवादात स्पष्ट केली. त्यानंतर विखे यांनी १३०० बेड शिल्लक आहेत, हे दाखवा, असे आव्हानच दिले होते. मात्र करोनाचे काम करण्यास डॉक्टर पुढे येत नाहीत, ही वस्तुस्थितीही द्विवेदी यांनी सांगितली.