महानंदाला चांगले दिवस येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:15 AM2021-01-01T04:15:47+5:302021-01-01T04:15:47+5:30

कोरोनामुळे देशाला लॉकडाऊनचा सामना करावा लागला. अत्यावश्यक सेवा सोडून सगळी व्यवस्था ठप्प झाली होती. त्या कालखंडात दूध संघांना अनेक ...

Good days will come to Mahananda | महानंदाला चांगले दिवस येणार

महानंदाला चांगले दिवस येणार

कोरोनामुळे देशाला लॉकडाऊनचा सामना करावा लागला. अत्यावश्यक सेवा सोडून सगळी व्यवस्था ठप्प झाली होती. त्या कालखंडात दूध संघांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. अशा परिस्थितीत महाविकास आघाडी सरकार शेतकरी व दूध संघाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याने सहकार क्षेत्राला उभारी मिळाली. त्यातच राज्य सहकारी दूध संघाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी राज्य शासनाच्या आरे ब्रँडची उत्पादने बनवण्याची परवानगी व आरेचे मुंबईमधील स्टॉल महानंदाला मिळाल्यापासून महानंदाची आर्थिक उलाढाल वाढणार आहे. महानंदाच्या दुग्धजन्य उत्पादनांची विक्री संपूर्ण राज्यभर करण्यासाठी दूध विक्री स्टॉलची लवकरच निर्मिती केली जाणार आहे.

महानंदाचे दूध व दुग्धजन्य उत्पादने गुणवत्तापूर्ण व उच्चप्रतीचे असल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीमध्ये उपलब्ध झाल्यामुळे महानंदाची उत्पादने अधिकच लोकप्रिय ठरली आहेत. महानंदाच्या अतिरिक्त दुधाची बनलेली दूध भुकटी राज्य शासनाच्या अटल अमृत आहार योजनेंतर्गत व बालकल्याण आदिवासी विभागामार्फत योजनेत समाविष्ट सर्व घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे. महानंद व केंद्रीय रक्षा मंत्रालय यांच्यात करार झाला असून भारतीय सैन्याला दूध पुरवठा महानंदाने सुरू केला आहे. महानंदाची वाटचाल योग्य दिशेने सुरू असल्यामुळे आर्थिक परिस्थिती लवकरच सुधारणार आहे.

Web Title: Good days will come to Mahananda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.