‘लव्ह स्टोरी’ अध्यायाची शुभमंगलने सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:19 AM2021-02-14T04:19:53+5:302021-02-14T04:19:53+5:30
श्रीगोंदा : श्रीगोंदा येथील मेहता व इथापे परिवाराने गौरव सोनल यांच्या अंतर्मनातील ‘लव्ह स्टोरी’चा अध्याय शाही विवाहाने ...
श्रीगोंदा : श्रीगोंदा येथील मेहता व इथापे परिवाराने गौरव सोनल यांच्या अंतर्मनातील ‘लव्ह स्टोरी’चा अध्याय शाही विवाहाने पूर्ण केला. शहरातील हा आंतरजातीय विवाह अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.
गौरव हा श्रीगोंदा येथील प्रसिद्ध व्यापारी दिलीप मेहता यांचा मुलगा, तर सोनल ही टाकळी कडेवळीत येथील भरत इथापे यांची कन्या आहे. ते दोघेही शिक्षणानिमित्त श्रीगोंदा शहरात एकत्र आले.
अकरावीत असताना एका वर्गामध्ये दोघांची ओळख झाली. बारावीनंतर गौरव पुण्याला एमआयटी काॅलेजला तर सोनल कोपरगाव येथील संजीवनी काॅलेजला प्रवेश घेतला. दोन जीव अंतराने लांब केले होते. मोबाइलमुळे दोघे जवळच होते; मात्र करिअरचा दरवाजा उघडल्याशिवाय प्रेमाच्या विश्वात कोणतेही पावले पुढे टाकायचे नाही, हे दोघांनीही ठरविले होते. दोन्ही कुटुंबातील व्यक्तींच्या भावनांना ठेच लागणार नाही, याची जबरदारी घेतली.
दोघे पदवीधर झाले आणि त्यांनी आई-वडिलांकडे विवाहाचा प्रस्ताव मांडला; मात्र नकार आला. दोघेही विवाह करण्यावर ठाम होते. पाच वर्षांचा काळ लोटला.
दोघांच्या भावनांचा विचार करून मेहता-इथापे परिवार एकत्र बसले. सोनल व गौरव दोघेही विचाराने पक्के आहेत, हे पाहिल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांचा विवाह लावून देण्याचे ठरविले. त्यांनी भविष्याचा विचार करून त्यांचा शाही विवाह लावून देण्याचा निर्णय घेतला. २६ जून २०१२ रोजी त्यांचा विवाह झाला.
याबाबत सोनल म्हणाली, लग्न झाल्यावर भोजन पद्धत, राहाणीमान याची थोडीशी अडचण झाली; मात्र मेहता परिवाराने माझ्या इच्छेनुसार बदल करून घेतले. मीही स्वत:त बदल केले आणि परिवारात रमले. आमच्या संसारात अर्हमच्या रूपाने पुत्ररत्न प्राप्त झाले.
फोटो १३ मेहता इथापे