गुड न्यूज : सकाळी १११ जण घरी परतले, कोरोनावर केली मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 13:25 IST2020-07-20T12:05:56+5:302020-07-20T13:25:33+5:30
अहमदनगर : जिल्ह्यातील १११ जण आज बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. कोरोनावर मात करण्यात ते यशस्वी ठरले आहेत. रुग्णसंख्या जरी दीड हजारांच्या पार गेली असली तरी आतापर्यंत एक हजार जणांनी कोरोनावर मात केली आहे.

गुड न्यूज : सकाळी १११ जण घरी परतले, कोरोनावर केली मात
अहमदनगर : जिल्ह्यातील १११ जण आज बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. कोरोनावर मात करण्यात ते यशस्वी ठरले आहेत.
रुग्णसंख्या जरी दीड हजारांच्या पार गेली असली तरी आतापर्यंत एक हजार जणांनी कोरोनावर मात केली आहे.
त्यांनी पूर्णपणे उपचार घेतले. त्यांच्या नंतरच्या दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्याने आणि रुग्णांना कोणतीही लक्षणे नसल्याने त्यांना घरी सोडण्यात आले, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.
आज घरी सोडण्यात आलेल्या १११ जणांपैकी नगर तालुक्यातील एक, नगर शहरातील ३७, नेवासा येथील पाच, राहाता येथील चार, पाथर्डी येथील १४, कन्टोनमेंट झोनमधील १, श्रीगोंदा शहरातील १, अकोले शहरातील सात, कर्जत येथील १ रुग्ण बरा झाला आहे.
त्यामध्ये आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या १ हजार १३६ इतकी झाली आहे.