संगमनेरकरांसाठी चांगली बातमी; तालुक्यातील चारही रूग्ण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 02:27 PM2020-04-19T14:27:16+5:302020-04-19T14:28:24+5:30
संगमनेर : तालुक्यातील आश्वी बुद्रूक येथील एक व शहरातील तीन अशा संगमनेरातील तालुक्याची चार जणांना कोरोनाची लागणी झाली होती. या सर्वांची दुसºयांदा तपासणी केली असता त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अशी माहिती प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, तहसीलदार अमोल निकम यांनी ह्यलोकमतह्णला दिली.

कोरोनाचा संसर्ग झालेल्या दोन रूग्णांच्या संपर्कात संगमनेर शहरातील १४ व तालुक्यातील एक असे एकुण १५ नागरिक आल्याने खळबळ उडाली होती. ही बाब समोर येताच प्रशासनाने सोमवारी (३० मार्च) तात्काळ या पंधरा संशयितांना ताब्यात घेत त्यांना अहमदनगरच्या जिल्हा रूग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर तालुक्यातील आश्वी येथील एका व्यक्तीलाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. या व्यक्तीलाही जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले होते. त्यामुळे संगमनेर तालुक्यात कोरोना बाधिताची रूग्णांची संख्या एकुण चार झाली होती. या सर्वांची दुसºयांदा कोरोना तपासणी करण्यात आली. त्यानंतर २० दिवसांनी हे रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे. रविवारी (१९ एप्रिल) अहमदनगर येथील जिल्हा रूग्णालयातून या चारही जणांना संगमनेर तालुक्यातील अधिग्रहित केलेल्या एका खासगी रूग्णालयात संस्थात्मक अलगीकरणासाठी दाखल करण्यात येणार आहे.