जामखेडला शासकीय कृषी महाविद्यालय
By Admin | Published: June 29, 2016 12:42 AM2016-06-29T00:42:08+5:302016-06-29T00:55:32+5:30
जामखेड : कर्जत - जामखेड विधानसभा मतदारसंघातील हळगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालयास मंगळवारच्या मंत्रिमंडळ
जामखेड : कर्जत - जामखेड विधानसभा मतदारसंघातील हळगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालयास मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली असून जिल्ह्यातील हे पहिलेच सरकारी कृषी महाविद्यालय आहे.
कृषी राज्यमंत्री व पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पात या महाविद्यालयाच्या स्थापनेची घोषणा केली होती.
दरम्यान, कृषी राज्यमंत्री शिंदे यांच्या २२ सप्टेंबर २०१५ च्या पत्राच्या अनुषंगाने राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेने १४ आॅक्टोबर २०१५ रोजीच्या बैठकीमध्ये या महाविद्यालयास मान्यता दिली होती.
या प्रस्तावास मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. हळगाव येथील गट क्रमांक १६ मधील ४० हेक्टर शासकीय जमीन उपलब्ध करुन देण्यात आली आहे. हळगाव ते जामखेड रस्त्यालगत हळगावपासून एक किलोमीटर अंतरावर हे महाविद्यालय उभे राहणार आहे. (वार्ताहर)