सरकार राममंदिर उभारू शकत नाही - विहिंप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 05:17 AM2018-05-19T05:17:31+5:302018-05-19T05:17:58+5:30

अयोध्येतील राम मंदिर उभारण्यासाठी संघटनांचे काम सुरू आहे. आम्ही न्यायालयाच्या निकालाची वाट पाहत आहोत.

 Government can not build Ram temple - VHP | सरकार राममंदिर उभारू शकत नाही - विहिंप

सरकार राममंदिर उभारू शकत नाही - विहिंप

अहमदनगर : अयोध्येतील राम मंदिर उभारण्यासाठी संघटनांचे काम सुरू आहे. आम्ही न्यायालयाच्या निकालाची वाट पाहत आहोत. एकूण पुराव्यांचा विचार केल्यास न्यायालय हिंदूंच्या बाजूने निकाल देईल, अशी आशा वाटते. सरकार राम मंदिर बनवू शकत नाही. हिंदू समाजच मंदिर उभारणार आहे, असा विश्वास विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय महासचिव मिलिंद परांडे यांनी व्यक्त केला़
परांडे म्हणाले, जो मंदिर बनविण्यासाठी विरोध करतो तो संपतो़ त्यामुळे सर्वांनी मदत करावी. राम मंदिर अयोध्येतील रामजन्माच्या भूमीवरच बनेल. स्वाभिमानाचा, राष्ट्रहिताचा, देशभक्तीचा अन् देशाच्या सन्मानाचा हा विषय आहे.
त्यामुळे लवकरच रामजन्मभूमीवर हिंदू समाज राम मंदिर उभारेल़ राम मंदिर उभारल्यानंतर भाजपाला निवडणुकीत फायदा होईल, असे इतर पक्षांना वाटत असेल तर त्यांनी राष्ट्रवाद जपत राम मंदिर उभारण्यासाठी मदत करावी, असे परांडे म्हणाले़

Web Title:  Government can not build Ram temple - VHP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.