दूध उत्पादकांच्या मागण्यांकडे सरकारचे दुर्लक्ष- राधाकृष्ण विखे यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 12:26 PM2020-07-30T12:26:33+5:302020-07-30T12:27:10+5:30

अहमदनगर : राज्यातील दूध उत्पादकांच्या मागण्यांकडे जाणीवपुर्वक केलेल्या दुर्लक्षाचा निषेध म्हणून महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात दिनांक १ आॅगस्?ट  २०२० रोजी आयोजित करण्यात आलेल्या या एल्गार आंदोलनात दूध उत्पादक शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन माजीमंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.

Government ignores the demands of milk producers: Radhakrishna Vikhe | दूध उत्पादकांच्या मागण्यांकडे सरकारचे दुर्लक्ष- राधाकृष्ण विखे यांचा आरोप

दूध उत्पादकांच्या मागण्यांकडे सरकारचे दुर्लक्ष- राधाकृष्ण विखे यांचा आरोप

अहमदनगर : राज्यातील दूध उत्पादकांच्या मागण्यांकडे जाणीवपुर्वक केलेल्या दुर्लक्षाचा निषेध म्हणून महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात दिनांक १ आॅगस्?ट  २०२० रोजी आयोजित करण्यात आलेल्या या एल्गार आंदोलनात दूध उत्पादक शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन माजीमंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.

याबाबत दिलेल्या पत्रकात विखे यांनी म्हटले आहे की, दूध उत्पादक शेतक-यांच्या समस्या दिवसागणीक वाढत चालल्या  आहेत. शेतीला जोडधंदा म्हणून दूग्ध व्यवसाय शेतकºयांना आधार ठरला असतानाच या व्यवसायाकडेच महाविकास आघाडी सरकारने जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले असल्?याचा आरोप करुन आ.विखे पाटील म्हणाले की, कोरोना संकटामुळे दूध उत्पादक शेतकरी अधिकच आर्थिक संकटात सापडले आहेत. राज्यात दूध उत्पादक शेतकºयांच्याही आत्महत्या सुरु झाल्या पण त्याच्याही संवेदना या सरकारला राहिलेल्या नाहीत. कोरोना संकटात दूध उत्पादक शेतकºयांना २५ रुपये हमीभाव देण्याची घोषणा महाविकास आघाडी सरकारने केली होती. प्रत्यक्षात या घोषणेची अंमलबजावणी झालीच नाही, महाविकास आघाडी सरकारने दूध उत्पादक शेतकºयांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला.


राज्यात भाजपाच्या वतीने दूध उत्पादकांचे आंदोलन झाल्यानंतर सरकार निर्णय घेईल अशी अपेक्षा होती. परंतू मंत्रीमंडळाच्या दोन बैठका होवूनही दूध उत्?पादकांच्या बाबतीत महाविकास आघाडी सरकार कोणताही ठोस निर्णय घेवू शकले नाही याकडे लक्ष वेधून आ.विखे पाटील म्हणाले की, शासनाच्या निर्णया विरोधात जावून सरकारमधील मंत्र्यांच्या दूध संघानीच उत्पादकांना कमी दरात दूध खरेदी करण्याची भूमिका घेवून एकप्रकारे उत्पादकांवर अन्याय केला आहे. शासनाच्या या निष्कियतेचा निषेध म्हणून राहाता येथे सकाळी १० वा. भाजपाच्या प्रमुख पदाधिकारी, दूध उत्पादक शेतकरी, दूध संकलन केंद्रचालकांच्या उपस्थितीत हे आंदोलन नगर मनमाड रोडवर स्टेट बॅकेसमोरील विरभद्र दूध उत्पादक संस्थेजवळ आंदोलन करुन दूध उत्पादकांच्?या मागण्यांचे निवेदन शासनाला देण्यात येणार असल्याचे आ. विखे पाटील यांनी सांगितले.


जनावरांच्या खाद्याचे वाढलेले भाव आणि दुसरीकडे दूधाला मिळणारा कमी दर त्यामुळे ग्रामीण भागातील हा शाश्वत व्यवसायही मोडकळीस आणण्याचे पाप महाविकास आघाडी सरकारकडुन होत आहे. निद्रीस्त सरकारला जाग आणण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने २० जुलै रोजी राज्?यभर आंदोलन करुन दूधाला प्रतिलिटर ३० रुपये भाव द्यावा, दूध उत्?पादक शेतकºयांना प्रतिलिटर १० रुपयांचे तातडीने अनुदान द्यावे, अशा मागण्याचे निवेदन दिले होते.

या मागण्यांबाबत सरकारने कोणताच निर्णय केला नाही. यामुळेच महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यासाठी १ आॅगस्ट २०२० रोजी राज्यभर पुन्हा  आंदोलन करण्याचा निर्णय पक्षाने घेतला असल्?याचे आ. विखे पाटील यांनी सांगितले. गावपातळीवर, तालुका स्?तरावर दूध उत्पादक शेतकरी, कार्यकर्त्यांनी १ आॅगस्ट रोजी सकाळी ८ ते १० या वेळेत सरकारच्?या निषेधाचे आंदोलन सोशल डिस्टन्सिंग नियम पाळुन करण्याचे आवाहन त्यांनी केले.

 

Web Title: Government ignores the demands of milk producers: Radhakrishna Vikhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.