शासनाने नाभिक दुकानदारांना मदत करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:19 AM2021-04-16T04:19:38+5:302021-04-16T04:19:38+5:30

कोपरगाव : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नाभिक व्यावसायिकांचे दुकान बंद करण्याचा शासनाने निर्णय घेेतल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. ...

The government should help nuclear shopkeepers | शासनाने नाभिक दुकानदारांना मदत करावी

शासनाने नाभिक दुकानदारांना मदत करावी

कोपरगाव : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नाभिक व्यावसायिकांचे दुकान बंद करण्याचा शासनाने निर्णय घेेतल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. नाभिक बांधवांना कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी राज्य शासनाने तातडीने आर्थिक मदत करावी, अशी मागणी भाजपाच्या प्रदेश सचिव, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कोल्हे म्हणाल्या, मुख्यमंत्री ठाकरे यांनी लाॅकडाऊनची घोषणा केली; परंतु केवळ काही घटकांचाच विचार केला असून, बहुतांश घटक विचारात घेतलेले नाहीत. त्यामध्ये बारा बलुतेदार, छोटे व्यावसायिक फुलवाले तसेच केशकर्तनालय यांच्यासाठी कोणतीच योजना नाही. वास्तविक नाभिक समाज हा स्वयंरोजगारातील सर्वात मोठा घटक आहे. मोठ्या प्रमाणात असलेल्या या घटकाचा विचार करण्याची गरज होती, त्याकडे दुर्लक्ष केलेले आहे. त्यामुळे या समाजामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. गेल्या लाॅकडाऊनमध्ये मोठया आर्थिक समस्यांचा सामना करत घडी बसविण्यासाठी कष्ट उपसाणाऱ्या या बांधवांवर पुन्हा संकट कोसळले आहे. दुकानांसाठी भाडेकरारावर घेतलेले गाळे, दुकानाचे भाडे थकलेले असून, मागील लाॅकडाऊन काळात थकलेली बिले भरण्याची परिस्थितीही राहिली नसल्याने व्यावसायिक सैरभैर झालेले आहेत. पुन्हा हेच संकट उभे राहिल्याने त्यांच्यापुढे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची समस्या निर्माण झाली आहे.

Web Title: The government should help nuclear shopkeepers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.