सरकारची अंत्ययात्रा; कांद्याने अडविला रस्ता

By Admin | Published: April 10, 2017 03:32 PM2017-04-10T15:32:09+5:302017-04-10T15:32:09+5:30

शेतकºयांना पूर्ण कर्जमाफी करण्यात यावी, यासह इतरही मागण्यांसाठी सोमवारी राहाता येथे शेतकºयांनी सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली.

Government's endowment; Onion road blocked | सरकारची अंत्ययात्रा; कांद्याने अडविला रस्ता

सरकारची अंत्ययात्रा; कांद्याने अडविला रस्ता

हाता : शेतकºयांना पूर्ण कर्जमाफी करण्यात यावी, यासह इतरही मागण्यांसाठी सोमवारी राहाता येथे शेतकºयांनी सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली. पोलिसांनी सरकारची तिरडी ताब्यात घेतल्यानंतर संतप्त शेतकºयांनी सरकारच्या विरोधात घोषणबाजी करीत नगर-मनमाड महामार्गावर कांदे फेकून रस्त्यावरच ठाण मांडत रास्ता रोको आंदोलन केले. शेतकºयांना पूर्ण कर्जमाफी द्यावी, शेतकºयांना वीजबिल माफ करावे, शेतकºयांची पाटबंधारे विभागाची पाणीपट्टी माफ करावी, परिसरातील शेतकºयांचा पाणीप्रश्न सोडवावा, शेतकºयांना निवृत्तिवेतन लागू करावे, या मागण्यांसाठी सोमवारी सकाळी शेतकºयांनी सरकारची वाजत-गाजत तिरडी यात्रा काढली. पोलिसांनी हस्तक्षेप करीत तिरडी ताब्यात घेतली. त्यानंतर संतप्त शेतकºयांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत निषेध व्यक्त केला. त्यांनतर वीरभद्र मंदिर ते शिवाजी चौक असा मोर्चा नेण्यात आला. शिवाजी चौकात नगर- मनमाड महामार्गावर कांदे फेकून रस्त्यावर ठाण मांडून ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. शेतकºयांच्या प्रश्नांबाबत राज्य सरकार उदासीन आहे. शेतकरीविरोधात निर्णय घेतले जात असल्याने या सरकारच्या कार्यकालात साडेसात हजार शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. या सरकारला शेतकºयांच्या प्रश्नांवर जाग येणार नसेल, तर हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा यावेळी शेतकºयांना दिला. तहसीलदार राहुल कोताडे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी गणेश कारखान्याचे अध्यक्ष मुकुंद सदाफळ, माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ ,मोहन सदाफळ, विठ्ठलराव शेळके, राजेंद्र बावके, अ‍ॅड. विजय सदाफळ, राजेंद्र कार्ले, दशरथ गव्हाणे, सुनील सदाफळ, राहुल सदाफळ, संजय सदाफळ, सुनील बोठे, भगवान टिळेकर, शेखर कार्ले यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Government's endowment; Onion road blocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.