सरकारकडून सहकाराची गळचेपी

By Admin | Published: October 10, 2016 12:41 AM2016-10-10T00:41:12+5:302016-10-10T01:04:03+5:30

संगमनेर : आताच्या सरकारला शेतकरी व सामान्यांच्या प्रश्नांशी काहीही देणेघेणे नाही. सहकार क्षेत्र मोडीत काढण्याचे काम सरकारकडून सुरु आहे

The government's syllabus | सरकारकडून सहकाराची गळचेपी

सरकारकडून सहकाराची गळचेपी


संगमनेर : आताच्या सरकारला शेतकरी व सामान्यांच्या प्रश्नांशी काहीही देणेघेणे नाही. सहकार क्षेत्र मोडीत काढण्याचे काम सरकारकडून सुरु आहे. मात्र संगमनेर तालुक्यात सहकारामुळे आर्थिक क्रांती निर्माण झाली. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या दुरदृष्टीमुळे दुष्काळी संगमनेर तालुक्यात संपन्नता आली. संगमनेरच्या सहकारातून निर्माण झालेली आर्थिक क्रांती दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी केले आहे.
संगमनेर तालुक्यातील राजापूर येथे लोकविकास ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचा रौप्यमहोत्सव निंबाळकर यांच्या हस्ते झाला. यावेळी अध्यक्षस्थानी माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात होते. व्यासपीठावर आ .डॉ. सुधीर तांबे, ज्येष्ठ पत्रकार मधूकर भावे, बाजीराव खेमनर, अ‍ॅड. माधवराव कानवडे, रामदास वाघ, रणजितसिंह देशमुख, भाऊसाहेब कुटे, शिवाजीराव थोरात, सभापती रावसाहेब नवले, सुरेशराव थोरात, आबासाहेब थोरात, माधव हासे, संतोष हासे आदी उपस्थित होते.
निंबाळकर म्हणाले की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरातांनी दिलेल्या आदर्श विचारांतून संगमनेर तालुका राज्यात अग्रेसर आहे. आ. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली येथील सर्व सहकारी संस्था सुरळीत सुरु असून मॉडेल ठरावे असे काम सहकाराच्या माध्यमातून येथे सुरु आहे. मात्र आताच्या सरकारला शेतकरी व सामान्यांच्या प्रश्नाशी काहीही देणेघेणे नाही. सहकार क्षेत्र मोडीत काढण्याचे काम सरकारकडून सुरु आहे. हे सरकार उत्पादक व शेतकऱ्यांचे नसून ग्राहक व्यापारी लोकांचे हीत जोपासणारे आहे. रिझर्व्ह बँकेकडून सहकार संपविण्याचे काम सुरु आहे. सहकार क्षेत्र टिकवायचे असेल तर तरुण पिढीला विकासाची माहिती पटवून दिली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
आ. थोरात म्हणाले की, तालुक्यात पतसंस्थांचेही मोठे जाळे निर्माण झाले असून, १५६ पतसंस्था प्रगतीपथावर आहेत. तालुक्याची अर्थव्यवस्था बदलण्याचे काम सहकारी संस्था व पतसंस्थांच्या माध्यमातून झाले आहे. मधुकर भावे म्हणाले की, काँग्रेस व राष्ट्रवादीने राज्यात सहकार वाढवला. सहकाराचे प्रशिक्षण देणारे विद्यापीठ हे संगमनेर तालुक्यात आहे. सहकाराने या तालुक्यात मोठे परिवर्तन झाले असून, सहकारी संस्था, पतसंस्था, व्यापार आणि शेतीचे नियोजन चांगले आहे, असे आ. तांबे म्हणाले.
यावेळी अनिल देशमुख, अमित पंडित, आर .एम. कातोरे, संपतराव गोडगे, रोहिदास पवार, रमेश गुंजाळ, सतीश कानवडे, चंद्रकांत कडलग आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक भारत शेलकर, सूत्रसंचालन जिजाबा हासे यांनी केले. भाऊसाहेब खतोडे यांनी आभार मानले.
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: The government's syllabus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.