पक्ष्यांसाठी धान्य, पाण्याची व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:19 AM2021-03-19T04:19:58+5:302021-03-19T04:19:58+5:30
जामखेड : उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे प्राणी व पक्ष्यांचे धान्य व पाण्यासाठी हाल होत आहेत. याच विचारातून ल. ना. ...
जामखेड : उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे प्राणी व पक्ष्यांचे धान्य व पाण्यासाठी हाल होत आहेत. याच विचारातून ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत होशिंग यांनी शिक्षकांच्या सहभागातून शाळेच्या प्रांगणात असलेल्या झाडांवर धान्य व पाण्याची व्यवस्था केली आहे. विद्यार्थ्यांनी आपआपल्या घराच्या परिसरात व झाडावर व्यवस्था करण्याचे आवाहन केले आहे.
ल. ना. होशिंग विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत होशिंग यांनी कला शिक्षक मुकुंद राऊत, हरीत सेना विभाग व विज्ञान विभाग प्रमुख बबनराव राठोड, रवींद्र निकाळजे, उपमुख्याध्यापक श्रीधर जगदाळे, पर्यवेक्षक रमेश आडसूळ, शिक्षक प्रतिनिधी पोपट जगदाळे, समारंभ प्रमुख संजय कदम, ज्येष्ठ शिक्षक बाळासाहेब पारखे, अनिल होशिंग, अर्जुन रासकर, सुभाष बोराटे, रोहित घोडेस्वार, विशाल पोले, भागवत सुपेकर, हनुमंत वराट, नरेंद्र डहाळे, किशोर कुलकर्णी, विजय क्षीरसागर, साईप्रसाद भोसले, राघवेंद्र धनलगडे, उमाकांत कुलकर्णी, स्वप्नील जाधव, नीलेश भोसले, अविनाश नवगिरे, सुरज गांधी, अमित सांगळे, विनोद उगले, भाऊसाहेब शेटे, ग्रंथपाल संतोष देशमुख, हनुमंत वराट, प्रमोद बारवकर उपस्थित होते. यावेळी प्राचार्य श्रीकांत होशिंग यांनी उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे पशु-पक्ष्यांचे अन्न व पाण्यावाचून हाल होऊ नये, यासाठी काय व्यवस्था करता येईल व विद्यार्थ्यांमार्फत हा प्रयोग करून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पक्ष्यांविषयी संवेदनशीलता व पर्यावरणाविषयी आपुलकीची भावना तयार करण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यात आला. तशी व्यवस्था विद्यालयाच्या प्रांगणातील झाडावर करण्याचे नियोजन आले.
---
१८ जामखेड, १
जामखेडच्या ल. ना. होशिंग विद्यालयात शिक्षकांनी पक्ष्यांसाठी धान्य, पाण्याची व्यवस्था केली.