थेट शिधापत्रिकेवर धान्य वितरणाची परवानगी द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:19 AM2021-04-12T04:19:18+5:302021-04-12T04:19:18+5:30
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सुमारे दोन हजार दुकानदारांचा जीव टांगणीला लागला आहे, अशी भीती त्यात व्यक्त करण्यात आली आहे. दुकानात ...
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सुमारे दोन हजार दुकानदारांचा जीव टांगणीला लागला आहे, अशी भीती त्यात व्यक्त करण्यात आली आहे. दुकानात धान्य घेण्यास येणाऱ्या कार्डधारकांचा अंगठा हातात धरूनच तो पॉज मशीनवर ठेवावा लागतो. एकदा अंगठा जुळला नाही, तर अनेक वेळा तीच प्रक्रिया करावी लागते. त्यामुळे दुकानदार बाधित होण्याची भीती देसाई यांनी व्यक्त केली आहे.
मास्क, सॅनिटायझर व डिस्टन्सिंगचे पालन केले तरी पॉज मशीनमुळे सरळ संपर्क येत असल्याने कोरोना परसण्याची शक्यता आहे. त्यामुळे नियम बदलावा, अशी मागणी देसाई यांच्यासह रज्जाक पठाण, बाळासाहेब दिघे, चंद्रकांत झुरंगे, विश्वास जाधव, सुरेश उभेदळ, शिवाजी मोहिते, कैलास बोरावके, गणपत भांगरे, बजरंग दरंदले, भाऊसाहेब वाघमारे, गोपीनाथ शिंदे, सुरेश कोकाटे आदींनी केली आहे.
-----