देवकौठे येथे धान्य आपल्या दारी उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 06:29 PM2020-04-16T18:29:35+5:302020-04-16T18:32:21+5:30
तळेगाव दिघे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाचे दिलेले सर्व नियम पाळून सोशल डिस्टन्स राखत संगमनेर तालुक्यातील देवकौठे येथील सेवा सहकारी सोसायटीमार्फत नागरिकांना घरोघरी जाऊन धान्याचे वाटप करण्यात आले. देवकौठे सोसायटीच्या पदाधिकाºयांनी ‘धान्य आपल्या दारी’ हा अभिनव उपक्रम राबविला.
लोकमत न्यूज नेटवर्क

देवकौठे येथे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांना घरोघरी जाऊन धान्याचे वाटप करण्यात आले. देवकौठे येथील विविध सहकारी सोसायटीने बाजार समितीचे संचालक, भारत मुंगसे, नाशिक मनपा स्थायी समितीचे सदस्य भागवत आरोटे, शॅम्प्रोचे उपाध्यक्ष इंजि. सुभाष सांगळे, एकनाथ मुंगसे यांच्या मार्गदर्शनाखाली सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र कहांडळ, उपाध्यक्ष नामदेव शेवकर, सचिव संजय आरोटे यांनी हा अभिनव उपक्रम राबविला.
सरकारच्यावतीने रेशनकार्ड वर देण्यात येणाºया गहू व तांदळाचे वाटप सोसायटीत न करता शासनाच्या नियमाचे पालन करून सोशल डिस्टन्स राखत घरोघरी जाऊन धान्य वाटप करण्यात आले. एका ठिकाणी गर्दी न करता, संसर्ग न होता घरोघरी धान्याचे वाटप होणार आहे. हा एक अभिनव उपक्रम असून शेतीत राहणाºया नागरिकांना, गावाकडील सर्व नागरिकांना आपल्या घरातच रेशनवरील धान्य मिळत आहे. याकामी सोसायटी अध्यक्ष राजेंद्र कहांडळ, उपाध्यक्ष नामदेव शेवकर, शांताराम आरोटे, सरपंच मंजुळाबाई सांगळे, तलाठी अमोल गडाख, ग्रामसेवक संजय गायकवाड, कामगार पोलीस पाटील शत्रूघन मुंगसे, मंगल सोनवणे, रोहिदास मुंगसे, ज्ञानेश्वर मुंगसे, रामविलास तापडिया, गंगाराम कहांडळ हे सदस्यही रेशन कार्ड वरील धान्य घरोघरी जाऊन वाटण्यात पुढाकार घेत आहेत.