ग्रामपंचायतीचा आज फैसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:19 AM2021-01-18T04:19:28+5:302021-01-18T04:19:28+5:30
अहमदनगर : जिल्ह्यातील ७०५ ग्रामपंचायतीच्या निकालाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. सोमवारी (दि. १८) काही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल सकाळी ...
अहमदनगर : जिल्ह्यातील ७०५ ग्रामपंचायतीच्या निकालाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. सोमवारी (दि. १८) काही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल सकाळी दहावाजेपर्यंत तर काही ठिकाणचे निकाल दुपारी बारा वाजेपर्यंत हाती लागण्याची शक्यता आहे. जास्त ग्रामपंचायती असलेल्या तालुक्यात एकाचवेळी दहा ग्रामपंचायतीचे, तर ग्रामपंचायतीची कमी संख्या असलेल्या तालुक्यात एकाचवेळी सर्व ग्रामपंचायतीचे निकाल हाती येणार आहेत. त्यामुळे सोमवारी (दि. १८) दुपारी बारापर्यंत ग्रामपंचायतीच्या निकालाचे सर्व चित्र स्पष्ट झालेले असेल.
जिल्ह्यातील ७६७ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक जाहीर झाली होती. पैकी ५३ गावात निवडणुका बिनविरोध झाल्या. ९ ठिकाणच्या जागा रिक्त असून ७०५ ग्रामपंचायतीमधील ५ हजार ७८८ जागांसाठी शुक्रवारी (दि. १५) मतदान झाले. सोमवारी (दि. १८) तहसीलच्या ठिकाणी मतमोजणी सुरू होणार आहे. मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून आधी पोस्टल आणि नंतर यंत्रावरील मतमोजणी सुरू होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी, नागरिकांनी मतमोजणी केंद्रावर जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. तसेच मिरवणुका काढण्यासही बंदी घालण्यात आली आहे.
-----------
तालुका मतमोजणी केंद्र मतमोजणी सुरू वेळ
अकोले तहसील कार्यालय सकाळी ८.०० वाजता
संगमनेर मातोश्री मालपाणी विद्यालय सकाळी १०.००वाजता
कोपरगाव तहसील कार्यालय सकाळी ९.००० वाजता
राहाता प्रशासकीय इमारत संकुल सकाळी १०.००वाजता
राहुरी कै. धुमाळ महाविद्यालय सकाळी ९.०० वाजता
श्रीरामपूर मध्यवर्ती प्रशासकीय इमारत सकाळी ९.०० वाजता
नेवासा शासकीय गोडाऊन सकाळी १०.००वाजता
नगर पाऊलबुधे विद्यालय सकाळी ९.०० वाजता
पारनेर तहसील कार्यालय सकाळी ९.०० वाजता
पाथर्डी तहसील कार्यालय सकाळी ९.०० वाजता
शेवगाव तहसील कार्यालय सकाळी ९.०० वाजता
कर्जत नवीन तहसील कार्यालय सकाळी १०.०० वाजता
जामखेड तहसील कार्यालय सकाळी ८.०० वाजता
श्रीगोंदा श्री. छ. शिवाजी महाविद्यालय सकाळी ९.०० वाजता