ग्रामसेवकांनी विकास आराखड्याचा अभ्यास करावा
By | Published: December 6, 2020 04:20 AM2020-12-06T04:20:59+5:302020-12-06T04:20:59+5:30
केडगाव : शासकीय नियमानुसार ठरवून दिलेल्या विकास आराखड्याच्या कामाचे नियोजन ग्रामसेवकांने केले पाहिजे. या आराखड्याचा सखोल अभ्यास करून गावातील ...
केडगाव : शासकीय नियमानुसार ठरवून दिलेल्या विकास आराखड्याच्या कामाचे नियोजन ग्रामसेवकांने केले पाहिजे. या आराखड्याचा सखोल अभ्यास करून गावातील प्रत्येक घटकासाठी कामे ग्रामसेवकानी सुचवून पूर्ण करावी, असे प्रतिपादन प्रविण कोकाटे यांनी केले.
पंचायत समिती नगर राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान २०२०-२१ आमचा गाव आमचा विकास ग्रामपंचायत विकास आराखडा पंचायत समिती अधिकारी -पदाधिकारी यांची तालुकास्तरीय कार्यशाळा आगडगाव येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमासाठी उपसभापती रवींद्र भापकर, माजी सभापती रामदास भोर, सुनीता भिंगारदिवे, गटविकास अधिकारी संजय केदारे, आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती मांडगे, ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत खाडे, बलभीम कराळे, मच्छिंद्र झावरे आदी उपस्थित होते.
यावेळी कैलास पठारे, अशोक सब्बन यांनी ग्रामविकास आराखडयाचे नियोजन कसे करायचे या विषयी मार्गदर्शन केले. यावेळी मच्छिंद्र कराळे, मधुकर म्हस्के, बाळासाहेब चेमटे, त्रिंबक सांळुके, ग्रामपंचायतीला नेमणूक करण्यात आलेले प्रशासक, ग्रामसेवक, अंगणवाडी प्रकल्प अधिकारी, वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत खाडे यांनी केले. सरपंचांची अनुपस्थिती या विकास आराखड्याची माहिती नियोजन कसे करावे, गावच्या विकास कामाचा आराखडा कसा असावा, यासाठी सरपंचाना निमंत्रीत केले होते. १०६ पैकी फक्त दहाच सरपंचांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली.
कोट...
५७ ग्रामपंचायतीवर सध्या प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र काही प्रशासक नेमणूक दिलेल्या गावात जात नाही अशा तक्रारी येत आहेत. प्रशासकाने आठवड्यातून दोन दिवस ग्रामपंचायतीला भेट द्यावी प्रशासकांना हे अतिरिक्त काम दिले आहे. कार्यालयात बसून कामे करावी. प्रशासकाने ग्रामपंचायतीच्या कामात हालगर्जीपणा केल्यास कार्यवाही करण्यात येईल. तसेच प्रशासक काळात जे कामे केली त्याचा लेखी अहवाल ग्रामपंचायत निवडणुका झाल्यावर घेणार आहे.
-रामदास भोर,
माजी सभापती, नगर