ढवळगावमध्ये आजी-माजी सैनिकांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:19 AM2021-01-21T04:19:12+5:302021-01-21T04:19:12+5:30
श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी माजी सैनिक बापू ढवळे यांनी सैनिक दिनाचे महत्त्व ...
श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी माजी सैनिक बापू ढवळे यांनी सैनिक दिनाचे महत्त्व सांगितले. गावातील नाना पोखरकर, आशुतोष मांडगे यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन बापू ढवळे मेजर, उपकार्याध्यक्ष प्रतीक्षा शिंदे, सारिका शिंदे, गणेश ढवळे, अजित लोंढे, मनीषा बोरगे, गणेश पानमंद, बाळासाहेब शिंदे, अनिता वाळुंज, पूजा शिंदे, अमोल बोरगे व ग्रामस्थांनी केले होते.
यावेळी अनिल वाळुंज यांच्यामार्फत अयोध्येतील राम मंदिर निर्माणसाठी निधी गोळा करण्यात आला. यावेळी बाबासाहेब शिंदे, गौतम वाळुंज, शिवाजी लोंढे, रामचंद्र लोंढे, शिवाजी ढवळे, शांताराम सातव, शहाजी वाळके, नाना तांबे, माउली शिंदे, बबन ढवळे, मनोहर बोरगे, तुकाराम बोरगे, आप्पासाहेब ढवळे, नाना वाळुंज, विजय पवार, रावसाहेब पोखरकर, पांडुरंग बनकर, संतोष शिंदे, महादेव शिंदे उपस्थित होते.
..
फोटो-२०ढवळगाव सत्कार
..
ओळी-ढवळगाव येथे सैनिक दिनानिमित्त आजी-माजी सैनिकांचा ग्रामस्थांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.