कांदा चाळीचे दीड कोटींचे अनुदान मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 10:10 PM2020-09-23T22:10:07+5:302020-09-23T22:10:26+5:30
अहमदनगर: सन २०१९-२० या वर्षातील कांदा चाळीचे एक कोटी ४५ लाखांचे अनुदान मंजूर झाले आहे, अशी माहिती खासदार डॉ़ सुजय विखे यांनी बुधवारी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे़
अहमदनगर: सन २०१९-२० या वर्षातील कांदा चाळीचे एक कोटी ४५ लाखांचे अनुदान मंजूर झाले आहे, अशी माहिती खासदार डॉ़ सुजय विखे यांनी बुधवारी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे़
कांदा उत्पादक शेतकºयांना काढणीनंतरच्या व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत अनुदान देण्याची योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे. या योजने अंतर्गत नगर जिल्ह्यातील शेतकºयांना अनुदानासाठी प्रस्ताव दाखल केले होते. परंतु, विविध कारणांमुळे शेतकºयांना अनुदान मिळाले नव्हते़ हे अनुदान शेतकºयांना तातडीने मिळावे, यासाठी प्रशासकीय स्तरावर प्रयत्न सुरू होते़ या प्रयत्नांना यश आले असून, जिल्ह्यातील १६८ शेतकºयांना सदर योजनेचा लाभ मिळणार आहे,असे विखे यांनी पत्रकात नमूद केले आहे़
़़़़
लाभार्थी शेतकरी असे
जामखेड- ५, कर्जत- ३७, राहुरी-२०, शेवगाव-३८, श्रीगोंदा-४६, अकोले-१२, संगमनेर- ५,