ग्रासरूट इनोव्हेटर : मानवचलित यंत्राने ज्वारी काढणी झाले सोपे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 12:45 PM2018-12-31T12:45:43+5:302018-12-31T12:51:16+5:30

ग्रासरूट इनोव्हेटर : या उपकरणाने ज्वारी काढण्याचे काम अत्यंत सोपे झाले आहे.

Grassroot Innovator : It is easy to harvest the Jawari by using an automatic mechanism | ग्रासरूट इनोव्हेटर : मानवचलित यंत्राने ज्वारी काढणी झाले सोपे 

ग्रासरूट इनोव्हेटर : मानवचलित यंत्राने ज्वारी काढणी झाले सोपे 

- अनिल लगड ( अहमदनगर)

यंदाच्या रबी हंगामातील ज्वारी पीक सध्या हुरड्यात आले आहे. अजून महिना, दीड महिन्यानंतर ज्वारीची काढणी सुरू होते. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने ज्वारीचे ताट काढण्यासाठी मानवचलित उपकरण शोधून काढले आहे. या उपकरणाने ज्वारी काढण्याचे काम अत्यंत सोपे झाले आहे.

राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात ज्वारीची लागवड केली जाते. ज्वारीचे ताट दणकट, बळकट झाल्यानंतर तिची मुळे खोलवर घट्ट, रुजलेली असतात. त्यामुळे काढताना शेतकऱ्यांना मोठे कष्ट सहन करावे लागतात. ताकदीचा वापर करून ताट उपटावे लागते, यात तळहाताला इजा होऊन फोडे येतात. फोडे फुटल्यानंतर त्याचे रूपांतर जखमांमध्ये होऊन त्रास होतो. ज्वारी काढणीचे काम शेतकरी सहसा सामूहिक पद्धतीने करतात. राज्यात सोप्या पद्धतीने ज्वारीचे ताट काढण्याचे यंत्र सध्यातरी कोठे विकसित झालेले नाही.

शेतकऱ्यांचे कष्ट दूर करण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने नेहमी महत्त्वाची भूमिका वठविलेली आहे. ज्वारीचे ताट काढण्यासाठीही विद्यापीठाने पुढाकार घेऊन मानवचलित फुले ज्वारी काढणी उपकरण विकसित केले आहे. या उपकरणाची शिफारसदेखील विद्यापीठाने केली आहे. या यंत्राद्वारे ज्वारीसह कपाशीदेखील उपटून काढता येऊ शकते. या उपकरणाचे वैशिष्ट्य असे की, बागायती तसेच कोरडवाहू ज्वारी मुळासहित काढण्यासाठी त्याचा उपयोग होतो. हाताने ज्वारी मुळासहित उपटून काढण्यापेक्षा कमी कष्टात या उपकरणाने ज्वारी काढता येते. हे यंत्र वजनाला हलके आहे. याचे वजन साधारण दोन किलोपर्यंत आहे. त्यामुळे ते इतर ठिकाणी उचलून नेण्यासाठी सोपे आहे. त्यामुळे या यंत्राचा वापर शेतकऱ्यांना सहज करता येते. हे उपकरण शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे.

Web Title: Grassroot Innovator : It is easy to harvest the Jawari by using an automatic mechanism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.