ग्रासरूट इनोव्हेटर : राहुरीच्या शेतकऱ्याने शोधले कमी खर्चात अधिक उत्पादन देणारे कांद्याचे वाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 12:00 PM2018-11-28T12:00:22+5:302018-11-28T12:02:20+5:30

गुरुदास मुसमाडे या प्रयोगशील शेतकऱ्याने गेली पाच वर्षे कांद्यावर संशोधन केले आहे़

Grassroot Innovator: Onion products, which give more yield on low cost, were discovered by Rahuri farmer | ग्रासरूट इनोव्हेटर : राहुरीच्या शेतकऱ्याने शोधले कमी खर्चात अधिक उत्पादन देणारे कांद्याचे वाण

ग्रासरूट इनोव्हेटर : राहुरीच्या शेतकऱ्याने शोधले कमी खर्चात अधिक उत्पादन देणारे कांद्याचे वाण

- भाऊसाहेब येवले (राहुरी, जि. अहमदनगर)

शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिक उत्पादन देणारे कांद्याचे वाण देवळाली प्रवरा (ता़ राहुरी) येथील शेतकरी गुरुदास मुसमाडे यांनी शोधले आहे़ तीनही हंगामांत त्यांनी शोधलेले ‘राजवर्धन’ हा कांदा शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे़ महाराष्ट्र, बिहार, मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, दिल्ली आदी राज्यांत जी.एम. राजवर्धन कांद्याच्या ट्रायल घेण्यात आल्या आहेत़ पुढील वर्षी देशभर या कांद्याचे बियाणे विक्रीस उपलब्ध होणार आहे़

गुरुदास मुसमाडे या प्रयोगशील शेतकऱ्याने गेली पाच वर्षे कांद्यावर संशोधन केले आहे़ कांद्याचा रंग लाल, आकर्षक गोलाकार आहे़ विशेष म्हणजे राजवर्धन कांदा करपा व भुरीला प्रतिकारक्षम आहे़ डबल पत्तीचा कांदा असल्याने अधिक कालावधीसाठी टिकतो़ काढणीनंतर रांगडा कांदा चार महिने, तर रबी व उन्हाळी कांदा सात-आठ महिने टिकतो़ भुसाऱ्यात कांदा लवकर खराब होत नाही व रंगही टिकून राहतो़ राजवर्धन कांद्याचे हेक्टरी ७ ते ८ किलो बियाणे पुरेसे ठरते़ राजवर्धन कांद्याचे इतर वाणापेक्षा २० ते २५ टक्के अधिक उत्पादन मिळते़ 

कांदा साठविल्यानंतर अन्य कांद्याच्या तुलनेत केवळ १० ते १५ टक्के नुकसान होते़ खाण्यासाठी तिखटपणा असलेला चवदार कांदा म्हणून राजवर्धनचे वैशिष्ट्य आहे़ या वाणाची पात सरळ, उभी वाढते़ कांद्याचे वजनही इतर कांद्यापेंक्षा जास्त भरते़ राजवर्धन कांदा पक्व झाल्यानंतर नवीन पाने येण्याची प्रक्रिया थांबते़ पातीमधील अन्नरस कांद्यात उतरून वजन वाढते़ कांद्याची पात पिवळसर होते़ पत्तीचा जाडसर भाग मऊ होऊन पात कोलमडते़ त्यानंतर कांद्याची काढणी केली जाते़ राजवर्धनची उगवणक्षमता अधिक आहे. राजवर्धन बियाणे शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार असल्याचे गुरुदास मुसमाडे यांनी सांगितले.

Web Title: Grassroot Innovator: Onion products, which give more yield on low cost, were discovered by Rahuri farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.