कोरोनाकाळात फार्मासिस्टचे मोठे योगदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:23 AM2021-09-27T04:23:04+5:302021-09-27T04:23:04+5:30
पाचेगाव : भारत हा औषध निर्मितीत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे. कोरोनाकाळात अहोरात्र फार्मासिस्टची दुकाने खुली ठेवणे. संसर्गाची भीती ...
पाचेगाव : भारत हा औषध निर्मितीत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे. कोरोनाकाळात अहोरात्र फार्मासिस्टची दुकाने खुली ठेवणे. संसर्गाची भीती न बाळगता नियमांचे पालन करून औषधे देणे. कोरोनाविषयी जनतेत जनजागृती करणे अशा माध्यमांतून फार्मासिस्टने समाजात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे आम्हाला फार्मासिस्ट असल्याचा अभिमान आहे, असे प्राचार्य डॉ. कुलदीप रामटेके यांनी गौरवोद्गार काढले.
नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील शिवा ट्रस्ट संचालित शिवाजीराव पवार कॉलेज ऑफ फार्मसी विद्यालयामध्ये जागतिक औषध निर्माता दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. व्यासपीठावर शिवा ट्रस्ट पाचेगाव कॅम्पसचे जनसंपर्क अधिकारी दादासाहेब जाधव, प्रवेश समन्वयक बाळासाहेब जाधव आदींसह शिक्षक उपस्थित होते.
महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या ब्लडप्रेशर, वजन, उंची, ऑक्सिजन पातळी, रक्तगट व हिमोग्लोबिन आदी तपासणीने झाली. या वेळी पथनाट्यही सादर करण्यात आले. कोरोनाच्या जनजागृतीसाठी कोविड नियमांचे पालन करत रॅलीही काढण्यात आली. या वेळी शिवा ट्रस्ट संस्थेचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब पवार यांनी सर्व फार्मासिस्ट शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना फार्मासिस्ट दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
-----
260921\1632651392131_whatsapp image 2021-09-26 at 12.42.07 pm.jpeg
शिवाजीराव पवार फार्मसी महाविद्यालयात औषध निर्माता दिवस साजरा