कार्टून कार्यशाळेस विद्यार्थ्यांकडून मोठा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:15 AM2021-01-10T04:15:36+5:302021-01-10T04:15:36+5:30

टिळक वाचनालयाच्या आगाशे सभागृहात आयोजित केलेल्या कार्टून कार्यशाळेचा शुभारंभ नगराध्यक्षा अनुराधा आदिक व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक ...

Great response from students to the cartoon workshop | कार्टून कार्यशाळेस विद्यार्थ्यांकडून मोठा प्रतिसाद

कार्टून कार्यशाळेस विद्यार्थ्यांकडून मोठा प्रतिसाद

टिळक वाचनालयाच्या आगाशे सभागृहात आयोजित केलेल्या कार्टून कार्यशाळेचा शुभारंभ नगराध्यक्षा अनुराधा आदिक व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाला. कार्यशाळेत चित्रकुमार भरतकुमार उदावंत व व्यंगचित्रकार रवी भागवत यांनी विद्यार्थ्यांना कार्टून कसे काढायचे, याचे प्रशिक्षण दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष लकी सेठी, महिला शहर अध्यक्षा अर्चना पानसरे, नगरसेवक रवी पाटील, राजेंद्र पवार, कलीम कुरेशी, अल्तमेश पटेल, रईस जहागीरदार, सोनल मुथ्था, गणेश ठाणगे, विजय खाजेकर, अर्जुन आदिक, मंजीत बत्रा, अविनाश पोहेकर, अभिषेक गुलदगड, सुंदरम युवा फाउंडेशनचे अध्यक्ष रोहन घोरपडे, अक्षय चव्हाण, वैष्णव सोनवणे, सिद्धांर्थ अंभोरे, समशेर खान, ऋषिकेश गडाख आदी उपस्थित होते.

---------

तूर खरेदी केंद्र सुरू करावे

श्रीरामपूर : तालुक्यात शासनाने तूर खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे अनिल औताडे व तूर उत्पादक शेतकऱ्यांकडून होत आहे. बाजारपेठेत व ग्रामीण भागात, बाजार समितीमध्ये हमी भावापेक्षा कमी भावात तूर खरेदी करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरू आहे. शासनाने श्रीरामपूर तालुक्यासाठी व परिसरातील गावातील तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी तातडीने तूर खरेदी केंद्र सुरू करावे अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन छेडतील, असाही इशारा तूर उत्पादक शेतकऱ्यांनी व शेतकरी संघटनेनी दिला आहे.

तूर हंगामामध्ये तयार झालेली तूर शेतकऱ्यांच्या शेतातून घरी आली आहे. आर्थिक अडचणी सोडविण्यासाठी तूर बाजारभावात मिळेल त्या भावाने विक्री करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू न झाल्यामुळे बाजारात हमी भावापेक्षा कमी भावाने तूर विकली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. आ. लहू कानडे यांनी तूर केंद्र सुरू होण्यासाठी त्वरित प्रयत्न करावेत. ८ दिवसांत केंद्र सुरू झाले नाही तर आंदोलन छेडले जाईल, असा इशारा अनिल औताडे व उत्पादक शेतकऱ्यांनी दिला आहे.

----------

सगळगिळे यांचा सेवापुर्ती सोहळा

श्रीरामपूर : तालुक्यातील भोकर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दीपक सगळगिळे यांचे सेवापूर्ती सोहळ्याचा कार्यक्रम नुकताच झाला. याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी संजीवन दिवे, राहुरीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर क्षीरसागर, विस्तार अधिकारी मंदा दुरगुडे, बेलापूर केंद्रप्रमुख उत्तम शेलार, वडाळा महादेव केंद्रप्रमुख मंगल गायकवाड- सगळगिळे, केंद्र मुख्याध्यापक खान, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक खिस्ती विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष दीपक कदम, माजी उपसरपंच राजेंद्र चौधरी, भारत विधाटे, सतीश शेळके, बबन काळे, पत्रकार बाबा अमोलिक, दीपक बर्डे, राजू लोखंडे, संजय झिने, राजू कदम, शाहीन अहमद, संजय डुकरे, श्रीमती दातीर, शेडगे, भावरे, कुऱ्हे, आहेर व गायकवाड आदी उपस्थित होते. प्रास्ताविक भाषण बाळासाहेब शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन अनंत गोरे यांनी केले, तर आभार संगीता क्षीरसागर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वंदना गवळी, रेहाना शेख, सुरेखा पालवे, छाया घोडके, सरदार पटेल, विश्वास जगन्नाथ, मल्हारी ठोकळ, आनंद गोरे यांनी परिश्रम घेतले.

---------

--

Web Title: Great response from students to the cartoon workshop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.