१०० खाटांचे कोविड सेंटरला हिरवा कंदील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:17 AM2021-05-28T04:17:16+5:302021-05-28T04:17:16+5:30
देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहातून ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे प्रभागनिहाय दक्षता समितीची आढावा बैठक घेण्यात आली. या ...
देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहातून ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे प्रभागनिहाय दक्षता समितीची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर नगराध्यक्ष कदम यांनी सांगितले. बैठकीस मुख्याधिकारी अजित निकत, कार्यालयीन अधीक्षक बन्सी वाळके, एम.एस पापडीवाल आदी उपस्थित होते. ऑनलाइन बैठकीत प्रत्येक प्रभागाचे नगरसेवक या दक्षता समितीमध्ये अध्यक्ष व सहअध्यक्ष आहेत.
प्रभागनिहाय रॅपिड टेस्ट, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग नगर परिषदेचे फिरते कोरोना रॅपिड अँटिजन चाचणी पथक, प्राथमिक आरोग्य केंद्रातील रॅपिड व आरटीपीसीआर टेस्टसाठी नागरिकांना प्रोत्साहन देणे, नागरिकांनी सामाजिक अंतर, मास्क आदी नियमांचे पालन करण्यासाठी नगरसेवक व दक्षता समितीने पुढाकार घ्यावा. माझे कुटुंब-माझी जबाबदारी या अभियानाचा आढावा घेण्यात आला. तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने देवळाली प्रवरा शहरात विना मोबदला १०० खाटांचे ऑक्सिजनयुक्त कोविड सेंटर सुरू करण्याबाबत विचार विनिमय करण्यात आला. कोविड सेंटरसाठी तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून मनुष्यबळ उपलब्ध करून घेणे.
हिवरे बाजारच्या धरतीवर प्रभागनिहाय विलगीकरणाची व्यवस्था निर्माण करणे. किराणा दुकानात गर्दी टाळण्यासाठी मोबाइलवर यादी पाठवून घरपोहच सुविधा उपलब्ध करण्यासाठी दक्षता समितीने पुढाकार घेऊन किराणा व्यावसायिक व नागरिकांना प्रवृत्त करणे आदी विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.