महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या अधिस्विकृतीला हिरवा कंदील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 05:07 PM2018-10-13T17:07:34+5:302018-10-13T17:07:40+5:30
राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या अधिस्विकृतीलाा अखेर नवी दिल्ली येथील अनुसंधान कृषि संशोधन परिषदेने हिरवा कंदील दाखविला आहे. यासंदर्भात विद्यापीठाला पत्राची प्रतिक्षा आहे.
राहुरी : राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या अधिस्विकृतीलाा अखेर नवी दिल्ली येथील अनुसंधान कृषि संशोधन परिषदेने हिरवा कंदील दाखविला आहे. यासंदर्भात विद्यापीठाला पत्राची प्रतिक्षा आहे.
दहा जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असलेल्या महात्मा फुले कृषि विद्यापीठाची मान्यता गोठविल्यामुळे दरवर्षी शिक्षण घेऊन बाहेर पडणा-या पाच हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले होते. राहुरी, पुणे, धुळे, कोल्हापूर, नंदुरबार, क-हाड येथील महाविद्यालयात शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांच्या करिअरचा प्रश्न चव्हाट्यावर आला होता.
विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ़अशोक फरांदे, संशोधक संचालक डॉ़शरद गडाख यांनी याबाबत अधिक माहिती दिली. नुकतीच नवी दिल्ली येथे आय़सी़आरच्या झालेल्या बैठकीत मान्यता मिळाली आहे. २५ ते २९ जुलै यादरम्यान नवी दिल्ली येथून आलेल्या समितीने प्रत्यक्ष माहीती घेतली. समितीचे अध्यक्ष डी. एस. चुनावत यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी, पुणे, कोल्हापुर, क-हाड, धुळे, नंदुरबार येथील महाविद्यालयाची पाहणी करण्यात आली. स्टाप, साहीत्य, वातावरण, भोजन, संशोधन व गुणवत्ता याची माहीती समितीन घेतली. अनुसंधान कृषि संशोधन परिषद यांच्याकडून राज्यातील चारही कृषि विद्यापीठांना अनुदान मिळते. अधिस्विकृतीअभावी हे अनुदान बंद झाले होते. तात्पुरत्या स्वरूपाचे अनुदान गेल्या दोन वर्षापासून विद्यापीठाला मिळत होते.
विद्यापीठाचे कार्यक्षेत्र असलेल्या दहा जिल्ह्यात ६४ खाजगी महाविद्यालये आहेत़ राजकीय आश्रयाने सुरू झालेल्या या महाविद्यालयांच्या दर्जाबाबत वारंवार प्रश्नचिन्हे आहेत़ शासनाने विद्यापीठावर दबाब आणून खाजगी महाविद्यालयांचे पीक फोफावले आहे.
नवी दिल्ली येथील अनुसंधान कृषि परिषदेच्या झालेल्या बैठकीत विद्यापीठाला अधिस्विकृती मिळाली आहे. यासंदर्भात लवकरच विद्यापीठाला याबाबत पत्र मिळणार आहे. कोणती गे्रड मिळाली हे अद्याप समजू शकलेले नाही़ यामुळे विद्यापीठाच्या शिक्षण, संशोधन व विस्ताराला गती मिळण्यास मदत होणार आहे. - डॉ. के. पी. विश्वनाथा, कुलगुरू, महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी