तनपुरे साखर कारखाना सुरू करण्यास हिरवा कंदील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 05:45 PM2020-07-10T17:45:27+5:302020-07-10T17:46:18+5:30
तनपुरे सहकारी साखर कारखाना आॅक्टोबर महिन्यात सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. कामगारांची थकीत देण्यासंदर्भात रकमेची तरतूद करण्यात येणार आहे, असे आश्वासन खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिले.
राहुरी : तनपुरे सहकारी साखर कारखाना आॅक्टोबर महिन्यात सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. कामगारांची थकीत देण्यासंदर्भात रकमेची तरतूद करण्यात येणार आहे, असे आश्वासन खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिले.
जिल्हा बँकेचे संचालक माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी याबाबत सहकार्य केले. तनपुरे कारखान्याच्या विस्तारीकरणासाठी अंदाजे तीन कोटी रुपये खर्च येणार आहे. मिलचे विस्तारीकरण करून कारखान्याची गाळप क्षमता ३६०० ते ३८०० टनापर्यंत नेण्यासाठी मिलची दुरुस्ती करावी लागणार आहे.
साडेचार कोटी रुपये खर्च करण्याची तयारी संचालक मंडळाने दाखवली. मागील वर्षांच्या दुष्काळी परिस्थितीमुळे नैसर्गिक आपत्तीमुळे कारखाना बंद राहिला. कामगारांचे पगार थकले. यावर्षी कारखाना या दृष्टिकोनातून निश्चित बाहेर येईल, अशी अपेक्षा विखे यांनी व्यक्त केली आहे.