कर्जमाफीची ‘ग्रीन लिस्ट’ आज व उद्या जाहीर होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 04:47 AM2017-10-16T04:47:56+5:302017-10-16T04:48:06+5:30
शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भात राज्यभरातून प्राप्त अर्जांची लेखापरीक्षकांकडून तपासणी करण्यात आली असून १ ते ६६ मुद्यांची माहिती अपलोड करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सोमवार व मंगळवारी ‘ग्रीन लिस्ट’ प्रसिद्ध होणार आहेत.
मिलिंदकुमार साळवे
अहमदनगर : शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भात राज्यभरातून प्राप्त अर्जांची लेखापरीक्षकांकडून तपासणी करण्यात आली असून १ ते ६६ मुद्यांची माहिती अपलोड करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सोमवार व मंगळवारी ‘ग्रीन लिस्ट’ प्रसिद्ध होणार आहेत. त्यासोबतच नामंजूर, त्रुटी असलेल्या याद्याही रेड लिस्ट, यलो लिस्ट म्हणून प्रसिद्ध होतील.
सहकार खात्याचे अधिकारी, कर्मचारी रात्रंदिवस काम करीत आहेत. शेतकरी कर्जमाफीचे पैसे सोमवार व मंगळवारी खात्यात जमा करण्यास सहकार विभाग सज्ज झाला आहे. जिल्हा सहकारी बँकेत कर्जमाफी योजनेसाठी नवीन खाते सहकार खात्याने उघडले आहे. मुंबईतून या खात्यात रक्कम वर्ग होताच काही तासांमध्ये संबंधित थकबाकीदार शेतकºयांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होणार आहे. रविवारी सुट्टी असूनही राज्यभरातील जिल्हा बँकेच्या शाखांमध्ये अधिकारी, कर्मचारी ठाण मांडून होते. अहमदनगर जिल्हा बँकेमार्फत सुमारे १ हजार कोटींची कर्जमाफी मिळेल, असा अंदाज आहे.