महमानवाला घरांघरांमधून अभिवादन, जय भीमचा जयजयकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 02:06 PM2020-04-14T14:06:59+5:302020-04-14T14:10:12+5:30
अहमदनगर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त घराघरामधूनच अभिवादन केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यघटनेचे पालन करीत नागरिकांनी महामानवाला अभिवादन केले.
अहमदनगर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त घरांघरांमधून अभिवादन केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यघटनेचे पालन करीत नागरिकांनी महामानवाला अभिवादन केले.
दरवर्षी डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक कार्यक्रम होतात.तसेच् मिरवणुका काढल्या जातात. सार्वजनिक ठिकाणी असलेल्या पुतळ्यासमोर अभिवादनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनीच घरामध्येच जयंती साजरी करण्याचे आवाहन नेते, कार्यकर्त्यांनी केले होते. या पार्श्वभूमीवर राजकीय नेते, कार्यकर्ते, सामान्य नागरिक सर्वांनीच घरामध्येच प्रतिेमेला अभिवादन केले आहे. भीमगीत गायन, वादन, पुस्तक वाचन, गोरगरिबांना मदत आदी माध्यमातून अभिवादन करण्यात आले. अनेकांनी घरामध्येच सजावट करून डॉ.आंबेडकर यांना अभिवादन केले आहे. यामुळे घराघरात जयंतीचा उत्साह दिसून आला.