टिळक यांच्या स्मृतीशताब्दी निमित्त अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 12:48 PM2019-05-09T12:48:04+5:302019-05-09T12:48:15+5:30
मराठी ख्रिस्ती साहित्य परिषद व ख्रिश्चन सोशल फेडरेशनच्या वतीने ख्रिस्त संतकवि आचार्य नारायण वामन टिळक यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त सिध्दार्थनगरच्या स्मशानभूमीतील त्यांच्या स्मृतीस्थळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
अहमदनगर : मराठी ख्रिस्ती साहित्य परिषद व ख्रिश्चन सोशल फेडरेशनच्या वतीने ख्रिस्त संतकवि आचार्य नारायण वामन टिळक यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त सिध्दार्थनगरच्या स्मशानभूमीतील त्यांच्या स्मृतीस्थळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मराठी ख्रिस्ती साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष रॉबर्ट निकाळजे समवेत ख्रिश्चन सोशल फेडरेशनचे अध्यक्ष रेव्ह.जी.एन. साळवे, राजू देठे, संजय आढाव, अॅड. विनायक पंडित, रेव्ह. देवदत्त कसोटे, रवी चांदेकर, मार्टिन पारधे, नंदकुमार उजगरे, प्रशांत घोडके, राजू शिंदे, डेव्हिड साळवे उपस्थित होते.
या अभिवादन कार्यक्रमात देवदत्त कसोटे यांनी टिळक यांच्या साहित्य सेवेचा गौरव करुन, त्यांच्या कायार्ला उजाळा दिला. टिळक यांनी रचलेले अभंग व लिहिलेले ख्रिस्त गायन ही ख्रिस्ती समाजाला एक अमोल देणगी असल्याचे परिषदेचे अध्यक्ष रॉबर्ट निकाळजे यांनी म्हटले. तसेच टिळक संत साहित्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांच्या नावे पुरस्कार व मराठी ख्रिस्ती साहित्य अकादमी सुरू करण्याची मागणी त्यांनी केली. अॅड. विनायक पंडित यांनी महापालिकेकडे टिळकांचे स्मृतीस्थळ सुशोभीकरण करण्याचे व त्याचे जतन करण्याची मागणी केली असल्याचे सांगितले. याप्रसंगी फेडरेशनचे अध्यक्ष जी. एन. साळवे यांनी अभिवादन प्रार्थना करून समपोचित संदेश दिला. उपासनेस रवी चांदेकर यांनी ही प्रार्थना केली. राजू देठे यांनी उपस्थितांचे आभार मानले. उपस्थितांनी नारायण वामन टिळक यांच्या स्मृतीस्थळी परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.