उत्साहात निघाली ग्रंथदिंडी, साहित्य संमेलनास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 11:10 AM2017-11-04T11:10:11+5:302017-11-04T11:10:19+5:30
अहमदनगर : महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्या वतीने सावेडी उपनगर शाखेने आयोजित केलेल्या विभागीय मराठी साहित्य संमेलनास सकाळी साहित्य दिंडीने मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर: महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्या वतीने सावेडी उपनगर शाखेने आयोजित केलेल्या विभागीय मराठी साहित्य संमेलनास सकाळी साहित्य दिंडीने मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. सकाळी साडेनऊ वाजता वाडीया पार्क मधील महात्मा गांधी पुतळ्यापासून निघालेली दिंडी न्यू टीळक रोडवरील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात सांगता झाली.
ग्रंथदिंडीमध्ये शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. रुपीबाई बोरा विद्यालय, पेमराज गुगळे विद्यालय, भाऊसाहेब फिरोदिया, न्यू आर्टस कॉमर्स अँण्ड सायन्स महाविद्यालयातील एनएसएसचे विद्यार्थी, एनसीसीचे पथक सहभागी झाले होते. दिंडींच्या अग्रस्थानी बँण्डपथक होते. या पथकाच्या संगीत तालावर मोठ्या उत्साहात दिंडी निघाली. संमेलनाचे स्वागताध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे उदघाटन झाले. यावेळी संमेलनाध्यक्ष रंगनाथ पठारे आदि साहित्यिक सहभागी झाले होते. वेगवेगळ्या वेषभुषा परिधान केलेली शाळेतील विद्यार्थी दिंडीमध्ये सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टीळक, तुकाराम महाराज यासह विविध वेभषूषा धारण करुन विद्यार्थी साहित्य दिंडीत सहभागी झाले होत. ग्रंथदिंडी साहित्य संमेलनाच्या ठिकाणी आल्यानंतर ग्रंथोत्सवाचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. संमेलनाध्यक्ष रंगनाथ पठारे यांच्या हस्ते रेबीन कापून ग्रंथोत्सवाचे उदघाटन करण्यात आले. उपस्थितांनी ग्रंथोत्सवातील बुक स्टॉलला भेटी देउन पुस्तकांची पाहणी केली.