कोपरगावात किराणा दुकान तीन दिवस राहणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:19 AM2021-04-17T04:19:06+5:302021-04-17T04:19:06+5:30

कोपरगाव : शहरासह तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे तालुक्यातील किराणा व्यापारी १६ एप्रिल दुपारी ४ वाजल्यापासून १९ ...

The grocery store in Kopargaon will be closed for three days | कोपरगावात किराणा दुकान तीन दिवस राहणार बंद

कोपरगावात किराणा दुकान तीन दिवस राहणार बंद

कोपरगाव : शहरासह तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे तालुक्यातील किराणा व्यापारी १६ एप्रिल दुपारी ४ वाजल्यापासून १९ एप्रिलपर्यंत स्वतःची दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवणार आहेत. त्याप्रमाणे पुढील प्रत्येक आठवड्यातदेखील मंगळवार, बुधवार व गुरुवार हे तीन दिवस सकाळी ८ ते दुपारी २पर्यंतच दुकाने उघडी ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती कोपरगाव किराणा मर्चंट्स असोसिएशनचे अध्यक्ष राजकुमार बंब यांनी दिली.

कोपरगाव व्यापारी महासंघाचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या स्व. यशवंतराव चव्हाण समता सहकार सभागृहात बैठक पार पडली. या बैठकीस कोपरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष विजय वहाडणे, उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, शिवसेनेचे कलविंदर दडियाल, भाजपचे कोपरगाव शहराध्यक्ष दत्ता काले, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तुषार पोटे, मनसेचे संतोष गंगवाल हे उपस्थित होते. व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष नारायण अग्रवाल, सदस्य दीपक अग्रवाल, किरण शिरोडे उपस्थित होते.

कोपरगाव शहरातील किराणा मर्चंट्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीतील निर्णयान्वये कोरोना आटोक्यात आणण्यास प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा यांनी केले आहे.

............

... तर समता पतसंस्थेशी संपर्क साधा.

कोपरगाव शहरातील बंदच्या कालावधीमध्ये नागरिकांना मर्यादित स्वरुपात, मर्यादित वस्तूंतर्गत जीवनावश्यक डाळ, तांदूळ, तेल, तूप, चहा, साखर, मीठ या वस्तूंची गरज भासल्यास समता पतसंस्थेच्या वतीने या जीवनावश्यक वस्तू घरपोच देण्याची तयारी समता पतसंस्थेचे अध्यक्ष काका कोयटे यांनी दर्शविली आहे.

Web Title: The grocery store in Kopargaon will be closed for three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.