ग्राऊंड रिपोर्ट : अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाची दैनंदिन रुग्णांची संख्या एक हजाराने घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:20 AM2021-05-13T04:20:31+5:302021-05-13T04:20:31+5:30

१५ एप्रिलपासून जिल्ह्यात कडक निर्बंधाची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली. तसेच कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत क्रमांक एकला असलेल्या अहमदनगर शहरात महानगरपालिकेने ...

Ground report: Daily number of corona patients in Ahmednagar district decreased by one thousand | ग्राऊंड रिपोर्ट : अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाची दैनंदिन रुग्णांची संख्या एक हजाराने घटली

ग्राऊंड रिपोर्ट : अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाची दैनंदिन रुग्णांची संख्या एक हजाराने घटली

१५ एप्रिलपासून जिल्ह्यात कडक निर्बंधाची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली. तसेच कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत क्रमांक एकला असलेल्या अहमदनगर शहरात महानगरपालिकेने २ मे ते १५ मे या कालावधीसाठी कडक लॉकडाऊनची घोषणा केली. त्याची अंमलबजावणी सुरू आहे. त्यामुळे नगर शहरात येणारे-जाणारे कमी झाले. एप्रिलमध्ये नगर शहरात रोज सरासरी ८००-९०० इतकी रुग्ण संख्या असायची. ती आता निम्म्याने घटली आहे. जिल्ह्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून गत महिन्याच्या तुलनेत दैनंदिन रुग्ण संख्या एक हजाराने कमी झाली आहे. गत महिन्यात दररोज सरासरी ५० जणांचा मृत्यू झाला. आता ही संख्याही रोज सरासरी २० वर आली आहे. ग्रामीण भागात दोनशे गावांनी कडक जनता कर्फ्यू पुकारला असून त्यामुळे रुग्णांची संख्या कमी होण्यास मदत झाली आहे.

----

अशी घटली रुग्ण संख्या

१ मे - ४२१९

२ मे- ३८२२

३ मे- २१२३

४ मे- ३९६३

५ मे - ४४७५

६ मे -४१३९

७ मे -४५९४

८ मे -३६१३

९ मे - ३३२८

११ मे -३१८४

---------

Web Title: Ground report: Daily number of corona patients in Ahmednagar district decreased by one thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.