राज्याच्या गुणवत्ता सुधार समितीवर गटशिक्षणाधिकारी पोपट काळे यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:25 AM2021-09-17T04:25:58+5:302021-09-17T04:25:58+5:30

कोपरगाव : राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या शैक्षणिक दर्जामध्ये सुधारणा व्हावी, आधुनिक काळाबरोबरचे तंत्रज्ञान आत्मसात करून ‘दिल्ली नगर निगम’च्या ...

Group Education Officer Popat Kale selected on State Quality Improvement Committee | राज्याच्या गुणवत्ता सुधार समितीवर गटशिक्षणाधिकारी पोपट काळे यांची निवड

राज्याच्या गुणवत्ता सुधार समितीवर गटशिक्षणाधिकारी पोपट काळे यांची निवड

कोपरगाव : राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या शैक्षणिक दर्जामध्ये सुधारणा व्हावी, आधुनिक काळाबरोबरचे तंत्रज्ञान आत्मसात करून ‘दिल्ली नगर निगम’च्या धर्तीवर महाराष्ट्रातील शाळांमध्ये मूलभूत अभ्यासक्रम व शिक्षण देण्यासाठी औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांच्या अध्यक्षतेखाली शासनाने सात सदस्यीय समिती स्थापन केली आहे.

त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील राहाता व कोपरगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी पोपट श्रीराम काळे यांची निवड करण्यात आली आहे. तसे शासनाच्या ग्राम विकास विभागाचे अवर सचिव सुनील हंजे यांनी निवडीचे पत्र १४ सप्टेंबर रोजी काढले आहे. या निवडीबद्दल जिल्हा परिषद शिक्षण समितीचे सदस्य राजेश परजणे यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन नुकताच पोपट काळे यांचा सत्कार केला.

ही नवीन स्थापित समिती दिल्ली येथे जाऊन तेथील सर्व शाळांचा दौरा करून उपलब्ध मूलभूत सुविधा व वापरली जाणारी अध्यापन पद्धती, साधने, शाळांना पुरविण्यात आलेल्या सोयी-सुविधा या सर्वांचा अभ्यास करणार आहे. राज्यातील शैक्षणिक धोरणांमध्ये आगामी काळात मूलभूत बदल करून जागतिक स्तरावर माहिती व तंत्रज्ञानासाठी उपयुक्त असे शिक्षण मुलांना देण्यासाठी व या कामी योग्य अशा शैक्षणिक साहित्य, सोयी-सुविधा तंत्राचा अवलंब ‘दिल्ली नगर निगम’ने केला आहे, त्याचप्रमाणे राज्यातही समिती आपला अहवाल शासनाला सादर करणार आहे.

.........

फोटोओळी -

जिल्हा परिषद शिक्षण समितीचे सदस्य राजेश परजणे यांनी पोपट काळे यांचा सत्कार केला.

.......

160921\img_20210916_140815.jpg

फोटो१६- पोपट काळे सत्कार- कोपरगाव 

Web Title: Group Education Officer Popat Kale selected on State Quality Improvement Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.