दररोज वाढणारी रुग्णसंख्या चिंताजनक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:20 AM2021-04-04T04:20:25+5:302021-04-04T04:20:25+5:30
तांबे यांनी शनिवारी (दि. २) त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. गेल्यावर्षी राज्यात कोरोनाचा शिरकाव झाला. अनेकांनी आपला जीव गमावला. या ...
तांबे यांनी शनिवारी (दि. २) त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. गेल्यावर्षी राज्यात कोरोनाचा शिरकाव झाला. अनेकांनी आपला जीव गमावला. या काळात शासनाने कोरोना रोखण्यासाठी केलेले प्रयत्न अत्यंत चांगले होते. मात्र, मध्यंतरी नागरिकांच्या ढिलाईमुळे पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली आहे. ही लाट अत्यंत तीव्र असून, संसर्गाचा वेग जास्त आहे. प्रत्येकाने काही लक्षणे आढळली तर तातडीने वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा. उपचार घेणे अनिवार्य आहे. याचबरोबर विनाकारण बाहेर पडणे टाळावे. शारीरिक अंतराचे नियम पाळा. मास्कचा वापर केलाच पाहिजे. तातडीने लस घ्या. लसीमुळे प्रतिकारशक्ती वाढत आहे. लसीकरणाबाबत कोणीही गैरसमज करून घेऊ नये. शासकीय यंत्रणेने लसीकरणाला प्राधान्य देत जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण कसे होईल, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले.