हत्या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून पालकमंत्री राम शिंदे यांनी राजीनामा द्यावा - चंद्रशेखर घुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 03:50 PM2018-04-29T15:50:58+5:302018-04-29T15:52:06+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन युवकांची गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेचा निषेध जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने करून पालकमंत्री राम शिंदे मंत्री झाल्यापासूनच जामखेडला १२ पोलीस निरीक्षक झाले आहेत. तीन महिन्यांपूर्वी नगर रस्त्यावर गोळीबार झाला होता. त्यांच्याच मतदारसंघाची अशी अवस्था असेल तर जिल्ह्याची काय अवस्था असेल. असा सवाल करून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी उपस्थित केला. शिंदे यांचा पोलीस यंत्रणावर वचक राहिला नाही. त्यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Guardian Minister Ram Shinde should resign by accepting the responsibility of the murder case - Chandrasekhar said | हत्या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून पालकमंत्री राम शिंदे यांनी राजीनामा द्यावा - चंद्रशेखर घुले

हत्या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून पालकमंत्री राम शिंदे यांनी राजीनामा द्यावा - चंद्रशेखर घुले

ठळक मुद्देआरोपी अटक होईपर्यंत जामखेड बेमुदत बंद

जामखेड - राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन युवकांची गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेचा निषेध जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने करून पालकमंत्री राम शिंदे मंत्री झाल्यापासूनच जामखेडला १२ पोलीस निरीक्षक झाले आहेत. तीन महिन्यांपूर्वी नगर रस्त्यावर गोळीबार झाला होता. त्यांच्याच मतदारसंघाची अशी अवस्था असेल तर जिल्ह्याची काय अवस्था असेल. असा सवाल करून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी उपस्थित केला. शिंदे यांचा पोलीस यंत्रणावर वचक राहिला नाही. त्यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रा. मधूकर राळेभात यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. घुले म्हणाले, तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर धंदे चालू आहे. खेडोपाडी पर्यत गावठी कट्टे आहेत. नगरमध्ये पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांची भेट घेऊन सदर घटनेचा तपास लावून आरोपी अटक करण्याची मागणी केली आहे. त्यांनी तपास निश्चितच लागेल काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागली आहेत. आरोपीच्या शोधार्थ पथके पाठवली आहे असे सांगीतले आहे. तरीपण आरोपी अटक होईपर्यंत जामखेड बेमुदत बंद ठेवण्यात येणार आहे.
राजेंद्र फाळके म्हणाले, या हत्याकांडास पालकमंत्री जबाबदार आहे. २०१९ ची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून गोळीबार घटना घडवून दहशतवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पालकमंत्र्यांबरोबर राज्यसरकार दोषी असल्याचा आरोप फाळके म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मधुकर राळेभात म्हणाले, तालुक्यातील गुंडाना पोसण्याचे काम पालकमंत्री राम शिंदे करीत आहेत. तालुक्यात प्रभारी राज ठेवून वाटेल तसे काम राम शिंदे या अधिका-यांकडून करीत आहेत. यावेळी प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र फाळके, बाळासाहेब जगताप, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अरूण कडू, दत्तात्रय वारे, राजेंद्र कोठारी, अरूण जाधव, डॉ. भास्करराव मोरे, शहाजी राळेभात, नगरसेवक अमित जाधव आदी उपस्थित होते.












 

Web Title: Guardian Minister Ram Shinde should resign by accepting the responsibility of the murder case - Chandrasekhar said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.