टँकर गेले कुण्या गावा ? पालकमंत्री राम शिंदे टँकरच्या जीपीएसबाबत अनभिज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 12:21 PM2019-05-14T12:21:43+5:302019-05-14T12:22:12+5:30

पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरमध्ये घोटाळे होऊ नयेत म्हणून टँकरला सरकारने जीपीएस यंत्रणा बसविली़ मात्र, टँकरमधील जीपीएसचे नियंत्रण कोण करते, ते मला माहीत नाही, असे पालकमंत्री तथा जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी सांगितले़

Guardian Minister Ram Shinde Tanker unaware of GPS | टँकर गेले कुण्या गावा ? पालकमंत्री राम शिंदे टँकरच्या जीपीएसबाबत अनभिज्ञ

टँकर गेले कुण्या गावा ? पालकमंत्री राम शिंदे टँकरच्या जीपीएसबाबत अनभिज्ञ

अहमदनगर : पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरमध्ये घोटाळे होऊ नयेत म्हणून टँकरला सरकारने जीपीएस यंत्रणा बसविली़ मात्र, टँकरमधील जीपीएसचे नियंत्रण कोण करते, ते मला माहीत नाही, असे पालकमंत्री तथा जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी सांगितले़
सोमवारी नगर जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत शिंदे यांना टँकरमधील जीपीएसबाबत प्रश्न विचारला असता, त्यांनी हे उत्तर दिले़ १० मे रोजी ‘लोकमत’ने नगर जिल्ह्यात स्टिंग आॅपरेशन करुन टँकरमधील अनियमितता उघडकीस आणली़ टँकरचे लाईव्ह ट्रॅकिंग न दिसणे, टँकरच्या जीपीएस रोजचा अहवाल सादर न होणे, काही टँकरची जीपीएस यंत्रणाच बंद असणे तर काही टँकरमध्ये जीपीएस यंत्रणाच नसणे, अशा अनेक त्रुटी ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनने चव्हाट्यावर आणल्या़ जीपीएस यंत्रणेवर नियंत्रण कोणाचे, या प्रश्नाचे उत्तर जिल्हाधिकाऱ्यांपासून पंचायत समितीतील कर्मचाºयांपर्यंत कोणालाच देता आले नव्हते़ अखेर ‘लोकमत’ने पालकमंत्री तथा राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनाच टँकरच्या जीपीएसवर नियंत्रण कोणाचे, असा प्रश्न केला़ त्यावर ते माहीत नाही, असे उत्तर शिंदे यांनी दिले़ टँकरमधील घोटाळे रोखण्यासाठी सरकारने टँकरवर जीपीएस बसविण्याचा निर्णय घेतला़ जीपीएसचा रिपोर्ट असल्याशिवाय टँकरची बिले अदा केली जाणार नाहीत, असेही ते म्हणाले़


‘लोकमत’ने उपस्थित केलेल्या मुद्यांची चौकशी लावली
‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन करुन टँकरच्या पाणी पुरवठ्यातील ज्या त्रुटी समोर आणल्या आहेत, त्यांची चौकशी लावली आहे़ तुमच्याकडील पुरावे प्रशासनाला सादर केल्यास निश्चित कारवाई करण्यात येईल, असे पालकमंत्री राम शिंदे पत्रकार परिषदेत ‘लोकमत’प्रतिनिधीला संबोधित करताना म्हणाले.

लोकमत फेसबुक पेजवर पुरावे
स्टिंग आॅपरेशनमध्ये ‘लोकमत’ला टँकरमध्ये जी अनियमितता सापडली ते सर्व व्हिडीओ व छायाचित्रे ‘लोकमत’च्या lokmat Ahmednagar या फेसबुक पेजवर टाकले आहे.

Web Title: Guardian Minister Ram Shinde Tanker unaware of GPS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.