पालकमंत्री म्हणतात, विजयादशमीला कोरोनाचे दहन करू, मात्र लॉकडाऊन नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 10:25 PM2020-09-17T22:25:34+5:302020-09-17T22:27:17+5:30
अहमदनगर : केंद्र सरकार लॉकडाऊनला आता परवानगी देत नाही. नगर जिल्ह्यात लॉकडाऊन नाही तर जनता कर्फ्यू लावण्याबाबत स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन निर्णय घ्यावा. पालकमंत्री म्हणून त्याला सहकार्य असेल. मात्र, प्रशासन त्यात सहभागी होणार नाही, अशी स्पष्ट भूमिका पालकमंत्री हसन मुश्रिफ यांनी पत्रकारांसमोर मांडली.
अहमदनगर : केंद्र सरकार लॉकडाऊनला आता परवानगी देत नाही. नगर जिल्ह्यात लॉकडाऊन नाही तर जनता कर्फ्यू लावण्याबाबत स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन निर्णय घ्यावा. पालकमंत्री म्हणून त्याला सहकार्य असेल. मात्र, प्रशासन त्यात सहभागी होणार नाही, अशी स्पष्ट भूमिका पालकमंत्री हसन मुश्रिफ यांनी पत्रकारांसमोर मांडली.
जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी कोरोना स्थितीचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आमदार संग्राम जगताप, आमदार आशुतोष काळे, महापौर बाबासाहेब वाकळे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, आयुक्त श्रीकांत मायकलवार, आरोग्य यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले, जनता कर्फ्यू लावण्याआधी दोन दिवस आणि संपल्यानंतर पुढे काही दिवस लोक बाजारात गर्दी करतात. त्यामुळे दहा दिवस केलेल्या कर्फ्यूचा काहीही फायदा होत नाही. दहा दिवसात घरात राहून जे कमवायचे ते एका दिवसात घालवायचे, असे लॉकडाऊनमुळे घडते आहे. त्यामुळे कर्फ्यूचा काहीच उपयोग होत नाही. तरीही स्थानिकांनी कर्फ्यूबाबत निर्णय घेतला तर त्याला सहकार्य केले जाईल. तालुक्यातील खासगी डॉक्टरांनी पुढे येऊन एखादे कोविड सेंटर चालू करायचे ठरवले तर त्याला स्थानिक स्वराज्य संस्थांनी जागा, सेवा, जेवण व्यवस्था उपलब्ध करून द्यावी. त्यामुळे सरकारी यंत्रणेवर ताण पडणार नाही. सरकारी दराच्या पन्नास टक्के दराने त्यांनी उपचार करावेत.
पॉझिटिव्ह आहेत त्यांना घरात राहण्याची अद्याप नगर जिल्ह्यात परवानगी देण्यात आलेली नाही. कोल्हापूर जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांना होम क्वारंटाईनची सवलत दिलेली आहे. तिथे १२ हजार अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. नगर जिल्ह्यात अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या चार हजारांच्या आसपास असते. त्यामुळे नगर जिल्ह्यात अद्याप पॉझिटिव्ह रुग्णांना घरातच थांबण्याबाबत परवानगी दिलेली नाही. आज जिल्ह्यात पुरेसे बेड उपलब्ध असून रुग्णांना उपचारही मिळत आहेत. त्यामुळे सध्या होम क्वारंटाईनची परवानगी देण्याची गरज नसल्याचे मुश्रिफ म्हणाले.
----------
मोहिमेत २५ टक्के रुग्ण वाढतील
‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ या मोहिमेतून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. लोकांनी अंगावर दुखणे काढू नये. रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार करणे व त्यांना बरे करणे हा या मोहिमेचा उद्देश असणार आहे. त्यामुळेच जिल्ह्यात साडेसहा हजार बेड तयार ठेवण्यात आले आहेत. २५ आॅक्टोबरला विजयादशमीच्या मुहूर्तावर कोरोनारुपी रावणाचे दहन करण्याचा निश्चय प्रशासनाने केला आहे. घरोघरी आरोग्य दूत म्हणून काम करणाºयांची जबाबदारीशासनानेघेतलीआहे. शासन किती पुरणार, त्यापेक्षा लोकांचीच जबाबदारी वाढली आहे. म्हणून ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ ही आता लोकचळवळ बनली पाहिजे. रशियाची लस मिळाली तर लोकांच्या मनातील भीती कमी होईल.