पालकमंत्र्यांनी घेतला घरकुलांचा आढावा
By | Published: December 5, 2020 04:33 AM2020-12-05T04:33:55+5:302020-12-05T04:33:55+5:30
जिल्हाधिकारी कार्यालय येथे बुधवारी जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, ...
जिल्हाधिकारी कार्यालय येथे बुधवारी जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, प्रकल्प संचालक सुनीलकुमार पठारे, तालुकास्तरावरून सभापती मीरा शेटे, तसेच तालुक्याचे तहसीलदार, गटविकास अधिकारी व कर्मचारी कार्यशाळेत सहभागी झाले होते.
घुले यांनी सांगितले की, प्रधानमंत्री आवास योजना व इतर राज्यपुरस्कृत घरकुल योजना गतिमान करण्यासाठी २० नोव्हेंबर २०२० या राष्ट्रीय आवास दिनाचे औचित्य साधून महा आवास अभियान राबविण्यात येत आहे. सर्वांसाठी घर हा राज्य शासनाचा महत्त्वाचा कार्यक्रम आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना व इतर राज्य पुरस्कृत रमाई, शबरी, पारधी आवास योजनेंतर्गत प्राप्त घरकुल उद्दिष्टानुसार पात्र लाभार्थ्यांना याचा लाभ देण्यात येईल. सर्व घरकुले गुणवत्तापूर्वक व विहित कालावधीत पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यातील प्रशासनामार्फत योग्य ती मदत केली जाईल. जागा उपलब्ध नसलेल्या लाभार्थ्यांना जागेसाठी योग्य ती मदत केली जाईल. त्यांनी जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांना महा आवास अभियानांतर्गत आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या अनुषंगाने आवाहन केले की, जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी सर्व आवास योजनांतर्गत आपापली घरकुले या कालावधीत पूर्ण करावीत व आपला जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर येईल यादृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावेत.