‘त्यांनी’ स्वीकारले अनाथ मुलांचे पालकत्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2016 12:49 AM2016-06-27T00:49:23+5:302016-06-27T01:00:02+5:30
जामखेड : येथील श्री नागेश विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या १३ अनाथ मुलांना डॉ. सागर शिंदे यांनी शैक्षणिक साहित्याचे वाटप करुन त्यांच्या पुढील शिक्षणासाठी पालकत्व स्वीकारले.
जामखेड : येथील श्री नागेश विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या १३ अनाथ मुलांना डॉ. सागर शिंदे यांनी शैक्षणिक साहित्याचे वाटप करुन त्यांच्या पुढील शिक्षणासाठी पालकत्व स्वीकारले. सामाजिक भान ठेवून माणुसकीचे दर्शन घडविले, रयत संस्थेच्या माजी विद्यार्थ्याने.
रयत शिक्षण संस्थेविषयी असलेली निष्ठा, तळमळ व स्वत:चे शिक्षण रयत संस्थेत झाल्याने गरीब विद्यार्थ्यांसाठी सामाजिक बांधिलकी व आपणही समाजाचे देणे लागतो, या उद्देशाने हा उपक्रम हाती घेतला आहे, असे डॉ. शिंदे यांनी सांगून आपण दहावीपर्यंत १३ विद्यार्थ्यांची शैक्षणिक जबाबदारी स्वीकारली असल्याचे जाहीर केले.
शाळा समिती सदस्य विठ्ठल राऊत म्हणाले, डॉ. सागर शिंदे यांनी अनाथ मुलांचे पालकत्व स्वीकारून समाजात वेगळा आदर्श निर्माण केला आहे. अशा उपक्रमामुळे एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही. यासाठी तालुक्यातील सर्व शिक्षकांनी विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांमार्फत असे अनाथ विद्यार्थी दत्तक घेऊन त्यांना मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी शाळा समिती अध्यक्ष अॅड. विष्णुपंत मुरूमकर, प्राचार्य निवृत्ती सोनवणे, उपप्राचार्य एस. एम. मुळे, पर्यवेक्षक कल्याण वायकर, शिक्षक रमेश बोलभट, अशोक डुचे, प्रकाश तावे तसेच मान्यवर उपस्थित होते.
(तालुका प्रतिनिधी)