म्हसे, माठ येथे हुमनी अळीबाबत मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:16 AM2021-05-28T04:16:23+5:302021-05-28T04:16:23+5:30

ढवळगाव : श्रीगोंदा तालुक्यातील म्हसे, माठ येथे कृषी विभागाअंतर्गत अधिकारी व कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली ऊसावरील हुमनी अळी नियंत्रणाबाबत प्रकाश ...

Guidance on Humani Ali at Mhase, Math | म्हसे, माठ येथे हुमनी अळीबाबत मार्गदर्शन

म्हसे, माठ येथे हुमनी अळीबाबत मार्गदर्शन

ढवळगाव : श्रीगोंदा तालुक्यातील म्हसे, माठ येथे कृषी विभागाअंतर्गत अधिकारी व कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली ऊसावरील हुमनी अळी नियंत्रणाबाबत प्रकाश सापळे तयार करण्याबाबतचे प्रात्यक्षिक नुकतेच घेण्यात आले.

माठ, म्हसे, वडगाव शिंदोडी येथील शेतकऱ्यांनी घराशेजारी व ऊसाची लागवड, कडुलिंब, बाभूळ किंवा बोरीचे झाड असलेल्या ठिकाणी प्रकाश सापळे तयार केले आहेत.

साधारणपणे हुमनी किडींच्या अंडी, अळी, कोश व पतंग अशा चार जीवन अवस्था असतात. त्यामधील अळी अवस्था ही ऊस पिकासाठी घातक असते. अळी अवस्थेमध्येच हुमनी कीड येते. त्यावेळेस अळी नियंत्रणात आणणे अशक्य होते व जास्त खर्चीकही होते. त्यामुळे ऊस पिकाचे जास्त प्रमाणात नुकसानही होते. त्यासाठी हुमनी कीड पतंग अवस्थेमध्येच नष्ट करणे योग्य असते, असे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रगतशील शेतकरी राजेंद्र गुलाबराव घेंगडे यांनी मागील वर्षातील प्रकाश सापळा लावल्याबाबतचा अनुभव व फायदा सांगितला. कृषी सहायक अनिल पाचपुते यांनीही मार्गदर्शन केले. मंडळ कृषी अधिकारी आबासाहेब ज्ञानदेव भोरे यांनीही मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी हुमणी अळीसाठी प्रकाश सापळे लावावेत, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांनी केले.

Web Title: Guidance on Humani Ali at Mhase, Math

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.