गुरु अर्जुन देव कोविड सेंटरमधून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:20 AM2021-05-10T04:20:43+5:302021-05-10T04:20:43+5:30

अहमदनगर : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत घर घर लंगर सेवेच्या माध्यमातून सर्वसामान्य कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी निशुल्क सेवा देणाऱ्या गुरु अर्जुन ...

From Guru Arjun Dev Kovid Center | गुरु अर्जुन देव कोविड सेंटरमधून

गुरु अर्जुन देव कोविड सेंटरमधून

अहमदनगर : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत घर घर लंगर सेवेच्या माध्यमातून सर्वसामान्य कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी निशुल्क सेवा देणाऱ्या गुरु अर्जुन देव कोविड केअर सेंटरमधून तब्बल १ हजार ३१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

घर घर लंगर सेवेच्या माध्यमातून ४ मार्चपासून महापालिकेच्या सहकार्याने येथील हॉटेल नटराज व जैन पितळे वसतिगृह येथे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. जैन पितळे येथे महिलांसाठी कोविड सेंटर कार्यरत आहे. या कोविड सेंटरमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण उत्तम असून, हॉटेल नटराज येथून ७५६ तर जैन पितळे वसतिगृह येथून २७५ महिला रुग्ण बरे होऊन घरी परतले असल्याचे सामाजिक कार्यकर्ते हरजीतसिंग वधवा यांनी सांगितले.

लंगर सेवेच्या वतीने हे दोन्ही कोविड सेंटर नि:शुल्क चालविण्यात येत आहे. यामध्ये रुग्णांना सकाळचा नाश्ता, दुपार व रात्रीचे जेवण देण्यात येते. रुग्णांसाठी सकाळचा नाश्ता हॉटेल रॉयल येथे तर दोन वेळचे जेवण हॉटेल अशोका येथे तयार केले जाते. योग शिक्षक दीपक पापडेजा रुग्णांकडून सकाळी योगासने करून घेतात.

गुरु अर्जुन देव कोविड केअर सेंटरसाठी लायन्स क्लब, अहमदनगर पोलीस दल, शीख, पंजाबी, जैन, सिंधी, गुजराती आणि सर्व समाजाचे योगदान लाभत आहे. या कामासाठी महापालिका आयुक्त शंकर गोरे, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, उपायुक्त योगेश डांगे, पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे, डॉ. सुज्योत सैंदाणे, डॉ. प्रदीप कळमकर, डॉ. सलमान शेख, योगेश तांबे, परिचारिका, वॉर्ड बॉय, स्वच्छता कर्मचारी सहकार्य देत आहेत. कोविड सेंटरच्या सर्व कार्यासाठी लंगर सेवेचे हरजीतसिंग वधवा, जनक आहूजा, राहुल बजाज, प्रीतीपालसिंग धुप्पड, किशोर मुनोत, प्रशांत मुनोत, कैलास नवलानी, राहुल बजाज, राजा नारंग, सतीश गंभीर, राजेंद्र कंत्रोद, सनी वधवा, आदित्य छाजेड, कबीर धुप्पड, टोनी कुकरेजा, राजेश कुकरेजा, मन्नू कुकरेजा, सुरेश कुकरेजा, काली लालवानी, नारायण अरोरा, गोविंद खुराणा, जय रंगलानी, राहुल शर्मा, शरद बेरड, प्रमोद पांतम, पुरुषोत्तम बेती, संदेश रपारिया, सुनील मुळे, विपुल शाह आदी परिश्रम घेत आहेत.

...............

रुग्णांच्या मनोरंजनाची व्यवस्था

रुग्णांच्या मनोरंजनासाठी या कोविड सेंटरमध्ये विविध खेळांचे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहेत. निसर्गरम्य मोकळ्या वातावरणात रुग्णांना घरासारखे वातावरण उपलब्ध करून देण्यात आले आहे. कोरोना झालेल्या रुग्णांना घरी न थांबता तत्काळ कोविड सेंटरमध्ये दाखल होण्याचे आवाहन लंगर सेवेच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: From Guru Arjun Dev Kovid Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.